आपला जिल्हा

मुंबादेवी व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

मुंबादेवी व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
मुंबादेवी व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० ऑगस्ट २०२४हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यात जगभरातील अनेक हिंदू बांधव आपपाल्या परीने देवाची पूजापाठ करत असतात. या काळात जगभरातील सर्व देव-देवतांची मंदिरे भाविकांनी अक्षरशः फुलून गेलेली असतात. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरात देखील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने  गेल्या १८ वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.

जाहिरात

कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यंदा या सोहळ्याचे हे १९ वे वर्ष असून शहरातील सुवर्णकार भवन सराफ बाजार या ठिकाणी गुरुवार दि २२ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होणाऱ्या या पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून. नऊ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्याची सुरुवात जगद्गुरू जनार्धन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधीस्थान बेट कोपरगाव येथील मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिभावाने पूजा आरती करत होणार आहे.

जाहिरात

शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या समाप्तीच्या दिवशी  शहरातील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिर सराफ बाजार येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
तसेच ज्या भाविकांना पारायणास बसायचे आहे त्यांनी दत्ता उदावंत ९५९५९४२४९३, कुणाल लोणारी ८७९३५३२६२८ व संजय मंडलिक ९८९०११८२७१ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन या प्रसंगी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे