आदिवासी समाज नेहमीच अग्रेसर- विस्तार अधिकारी वाघिरे
आदिवासी दिन विविध उपक्रमांनी साजरा
कोपरगाव विजय कापसे दि ११ ऑगस्ट२०२४– संपूर्ण देशभरातील आदिवासी समाज हा समाज हितासाठी व देश हितासाठी च्या कार्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे मत कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंडित वाघेरे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोपरगाव येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कोपरगाव शहरात संपन्न झालेल्या आदिवासी दिन कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले तर अनेक चिमुकल्यानी आदिवासी गाण्यावर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंतांचा सन्मान केला. आदिवासी आश्रम शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना खाऊचे व मिठाईचे वाटप करत त्यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, नायब तहसीलदार राजू चौरे, सहाय्यक कृषी अधिकारी ज्ञानदेव ठाकरे, रयत शिक्षक बँकेचे संचालक दीपक भोई, आदिवासी महादेव कोळी युवक संगीत संघाचे जिल्हाध्यक्ष अमित आगलावे, के बी पी विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी सातव, साई ग्रुपचे अनिल झाल्टे आदीं सह आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.