अमृतवाहिनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना १००% प्लेसमेंट
चतुर्थ वर्षातील एकूण ६३ विद्यार्थ्यांना परीक्षे अगोदरच नोकऱ्या
संगमनेर प्रतिनिधी दि ११ ऑगस्ट २०२४– भारताच्या जडण घडणीमध्ये आजपर्यंत हरित क्रांती,दुग्ध क्रांती, औद्योगिक क्रांती, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती इत्यादी चे महत्व आहे आणि येणाऱ्या काळात ऊर्जा बचत व संवर्धन क्रांती महत्वाची ठरणार आहे. भारत सरकारच्या नियोजना नुसार २०३० हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग असेल. प्रदूषणापासून मुक्तता,पर्यावरण रक्षण,देशांतर्गंत सुरक्षा व उत्पादन क्षमतेला चालना यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती तसेच खाजगी वाहन व पब्लिक वाहतूक क्षेत्रांतील ३० % बाजारपेठ काबिज करणे हे भारताचे उद्दीष्ठ आहे. याच अनुषंगाने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चतुर्थ वर्षातील सर्वच ( एकूण ६३ ) म्हणजेच १००% विद्यार्थ्यांना व्दितीय सत्रपरीक्षे अगोदरच विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे ही विशेष आनंदाची गोष्ट असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेशयांनी सांगितले आहे.
अमृतवाहिनी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणाली राबविणारे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित आहे. संगमनेर व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बारावी सायन्स महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थी हे अमृतवाहिनीचा स्वच्छ सुंदरहरित परिसर, अद्ययावतसुविधांनी युक्त होस्टेल, सुसज्ज प्रयोगशाळा , लायब्ररी, प्रशस्त क्रीडांगण, जीम, कँटीन तसेच येथील अनुभवी शिक्षकांद्वारे टीचिंग लर्निंग पद्धती, विद्यार्थी केंद्रित उपक्रम,मेधा फेस्टिवल, यामुळे अमृतवाहिनीमध्ये शिक्षण प्राप्त करून उज्वल करिअर घडविण्यासाठी अमृतवाहिनी कॉलेजला विशेष प्राधान्य देतात.
यावर्षी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या चतुर्थ वर्षातील सर्वच ( एकूण ६३ ) म्हणजेच १००%विद्यार्थ्यांना व्दितीय सत्रपरीक्षे अगोदरच विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नौकरी मिळाली आहे. यामध्ये जॉन्सन – ०४, फॉक्सकॉन्ट्रोल – ०१, कॅपिटल व्हाया – ०२,, फिन्स सोलुशन – ०१, पॉलीकॅब – ०४, वोरलेय – ०१, किर्लोस्कर प्नऊमॅटिक – ०१, ,क्यू स्पायडर -०२, रिनेक्स टेक ०१, एम जी इलेक्ट्रिका – ०१, एबीबी लिमिटेड – ०४, केएस बी लिमिटेड – ०१, , कनेक्टवेल – ०२, अशीदा – ०५, ,रिषभ इंस्ट्रुमेंट्स -०१, पाटील ऑटोमेशन – ०२, टी डी के नाशिक – ०६, सुरीन ऑटो -०३ ,पोलीबॉन्ड – ०४,एपिटोम – २१, आयटेक रोबो अँड ऑटो – ०३, शारदा मोटर्स – २९, टी सी आय पुणे – ०५, टी व्ही एस लुकास – १२, एक्साईड – ०६, मल्टी क्वाड्रांट – ०१ इत्यादी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एकूण १२३ विद्यार्थ्यांना विशेष पॅकेज सह नोकरी मिळाली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन दोन कंपन्यांचा पर्याय उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटसाठी महाविद्यालया मार्फतसतत तयारी करून घेतली जाते.यामध्ये प्रामुख्याने विविध नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदांवर कार्यरत असणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व महाविद्यालयाचे शिक्षक वृंद या सर्वांची विशेष मदत घेतली जाते. विद्यार्थ्यांसाठी जेनेरिक आणि कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग,बडी स्कीम ,औद्योगिक इंटर्नशिपद्वारे नोकरी,फॉरेन लँग्वेज जसे की जापनीज व जर्मन भाषा ट्रेनिंग सेंटर तसेच विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी विशेष प्रशिक्षण, समुपदेशन कार्यशाळा ,सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट प्रशिक्षण शिबीर इत्यादी आयोजित केले जाते अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रशांत वाकचौरे यांनी दिली. विद्यार्थ्यांची कोअर कंपन्यांमध्ये विशेष निवड व्हावी या दृष्टीने मॉक इंटरव्ह्यू ,टेक्निकल क्विझ, डिबेट,ग्रुप डिस्कशन ,विविध कार्यशाळा, वेबिनार, सेमिनार, गेस्टलेक्चर, इंडस्ट्री व्हिजिट ,इंटर्नशिप,वर्कशॉप इत्यादी नवीन भारतीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अनुषंगाने इलेक्ट्रिकल ब्रांच च्या विद्यार्त्यांना इंडस्ट्री रेडी बनवण्यासाठी सर्वतोपरी तत्पर असल्याची माहितीइलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. सुनील कडलग यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल,संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात,मा. आ.डॉ.सुधीर तांबे,विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, संस्थेचे अकॅडेमिक डायरेक्टर डॉ. जे.बी.गुरव,डॉ.प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी.वाघे यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील सर्व प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे,व त्यांच्या पालकांचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
यावर्षी अमृतवाहिनीच्या एकूण ७७९ विद्यार्थ्यांना व्दितीय सत्र परीक्षे अगोदरच विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट.
साकुरा लॅबच्या माध्यमातून फॉरेन- जापनीज लँग्वेज ट्रैनिंग सेंटर
– ४०० kw सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प,५ kw हायब्रीड सोलर विंड ऊर्जा प्रकल्प,बायोगॅस प्रकल्प,इसरो नोडल सेंटर,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अद्ययावत रोबोटिक्स लॅब,इलेक्ट्रिकल व्हेईकलवर्कशॉप,एनर्जी एक्सलन्स सेंटर,आर्टीफिसिअलइंटेलिजन्स लॅबइत्यादि उपलब्ध
– चार वेळा एन बी ए, नॅक अ+ दर्जा आणि वेळोवेळी आय. एस. ओ.मानांकनामुळेसर्व शैक्षणिक प्रक्रिया उच्च दर्जायुक्त आहेत.
डॉ.एम.ए.व्यंकटेश
प्राचार्य