आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
येवला प्रतिनिधी दि १५ ऑगस्ट २०२४- विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य हेमंत शाह, प्राचार्य तुषार कापसे, मठाधिपती कंकाली बाबा उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत,ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी इयत्ता ५ वीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत इयत्ता ६ वीतील पूर्वा गवळी हिने भारत मातेची वेशभूषा धारण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नर्सरी ते दहावीच्या वर्गातील पार्थ महाजन,शौर्य साळवे,वेदिका आहेर,ज्ञानेश्वरी पाटील,श्रावणी वरोडे,साई चांदवडे,प्रज्वल बर्डे, वेदिका लचके,अपूर्वा पल्हे,समीक्षा जोरी,नंदिनी डालकरी, कावेरी खिराडकर,ईश्वरी धनवटे,स्वराज पुणे, प्रज्ञेश कासार,शौर्य कंदलकर,शुभम पवार,ऐश्वर्या आहेर,आदिती भावसार या विद्यार्थ्यांनी देश भक्ती पर आपले मत व्यक्त केले.
इयत्ता ६ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थीनीनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. इयता दुसरीतीळ प्रांजल नागपुरे व काव्या कटारे यांनी देखील सुंदर नृत्य सादर केले. काव्या गायकवाड,निशिता महाले,गीता कायस्थ,दीक्षा वरोडे आराध्या देशमुख या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान वर नाटिका सादर केली. वर्षा गवळी यांनी स्वातंत्र्यदिना विषयी माहिती सांगितली.
तसेच प्राचार्य तुषार कापसे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन माहिती सांगितली व स्वच्छ भारत अभियान याविषयी विद्यार्थ्यांना शपथ दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येकाने एक झाड आज लावावे व त्याचे संवरक्षण करावे. प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवला तर नक्कीच भारत स्वच्छ व सुंदर होईल असे सांगितले.