कोपरगाव पोस्टात स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण संपन्न
कोपरगाव पोस्टात स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण संपन्न
७८ वा स्वातंत्र्यदिन कोपरगाव पोस्टात साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑगस्ट २०२४–संबंध देशभरात ७८ व स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पोस्ट डाक निरीक्षक अनंत सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी पोस्टमास्तर राजेश नेतनकर,कैलास डोळे, रामदास मोरे, विजय जोर्वेकर, लोकमत तडवी, सोमनाथ तांगडे, पोपट सुळ, संजय जाधव, नितीन वाघमारे, विशाल गवळी, ज्ञानेश्वर पगारे, अर्जुन मोरे, बापू खैरनार, संतोष सिंगल, बापूसाहेब चव्हाण, विजय बाभुळके, शिवाजी ठेवले, राहुल गजरे आदि पोस्ट विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच ॲड. पत्रकार इंजिनिअर साईप्रसाद डोखे उपस्थित होते. या प्रसंगी कोपरगाव डाक निरीक्षक अनंत सोनवणे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.