टेके पाटील ट्रस्टच्या वतीने “वापरा व परत करा” विनामूल्य उपक्रमाची सुरुवात
टेके पाटील ट्रस्टच्या वतीने “वापरा व परत करा” विनामूल्य उपक्रमाची सुरुवात
टेके पाटील ट्रस्टच्या वतीने “वापरा व परत करा” विनामूल्य उपक्रमाची सुरुवात
कोपरगाव विजय कापसे दि १७ ऑगस्ट २०२४ : सामाजिक बांधिलकी जपताना माणुसकीची भिंत, विविध साहित्यांचे वाटप, निसर्ग संवर्धन यासह वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी मोठमोठ्या शहरातील सामाजिक संस्था पुढाकार घेत असतात. परंतु, ग्रामीण भागातही परोपकाराची भावना ठेऊन राहूल (दादा) मधुकरराव टेके पाटील चरीटेबल ट्रस्टने घेतलेल्या पुढाकारातून मागील तीन वर्षापासून वारी परिसरातील गरजवंताची सेवा करीत आहे. हे कार्य निश्चितच समाजासाठी उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय ख्यातीचे साई कथाकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मोफत मदत सेवा केंद्राच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गरजवंतासाठी रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य “वापरा व परत करा” या विनामूल्य उपक्रमाचा साई कथाकार सुरासे महाराज यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१५) फीत कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ह. भ. प. सुरासे महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वस्तूंचे पूजन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबुराव पाळंदे यांनी दातृत्वाच्या भावनेतून या उपक्रमासाठी तीन हजार रुपये किमतीचे सलाईन स्टॅन्ड, वॉकर व हँडस्टिक भेट दिल्या. त्याबद्दल त्यांचा छोटासा सन्मान करण्यात आला. यावेळी रामदास सोनवणे, जितेंद्र टेके, छबुराव पाळंदे, संजय करपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे, प्रसिद्ध विधीज्ञ अँड. अमोल टेके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छबुराव पाळंदे, प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, मदत सेवा केंद्राच्या संचालिका स्मिता काबरा, कामगार नेते रामदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव काकळे, योगेश झाल्टे, युवा उद्योजक दिनेश निकम, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, गजानन टेके, मधुकर गायकवाड, भीमराव आहेर, उत्तमराव वाकचौरे, विजय ठाणगे, बापूराव बहिरमल, विलासराव गोंडे, वारी सेतू केंद्राचे संचालक रवींद्र टेके, जीत अकॅडमी चे संचालक जितेंद्र टेके, अजीम शेख, पोस्टमास्तर संजय कवाडे, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र मुरार, दत्तात्रय टेके, मच्छिद्र मुरार, संजय कर्पे, महेश कर्पे, दीपक झाल्टे, रावसाहेब वाघ, स्वप्निल टेके, शंकर धामणे, चेतन सुरासे, आकाश निळे, आदित्य निळे, विशाल त्रिभुवन, युनूस शेख, अमित झाल्टे, भैय्या रोकडे, सक्षम आवारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रोहित टेके यांनी मानले.