राहुल दादा टेके पाटील ट्रस्ट

वारीत नवरात्रोत्सवात ज्योत घेऊन धावल्या महिला; उक्कडगाव येथून आणली ज्योत  

वारीत नवरात्रोत्सवात ज्योत घेऊन धावल्या महिला; उक्कडगाव येथून आणली ज्योत  
राहुल दादा मित्र मंडळातील महिलांचा पुढाकार 
जाहिरात नोकरी मेळावा

कोपरगाव विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२४तालुक्यातील वारी येथील राहुल दादा मित्र मंडळातील महिलांनी यंदाच्या नवरात्रोत्सवात पुढाकार घेऊन श्रीक्षेत्र उक्कडगाव ते श्रीक्षेत्र वारी येथे गुरुवारी (दि.३) घटस्थापनेच्या दिवशी धावत ज्योत आणली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच महिलांनी पुढाकार घेऊन गावात वाजतगाजत ज्योत आणल्याने वारीसह तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मंडळाचे यंदाचे सातवे वर्ष होते.

जाहिरात
      वारी येथे जगदंबा देवी मातेचे पौराणिक आख्यायिका असलेले जागृत मोठे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात पंचवीस वर्षांपूर्वी गावातील मृत्युंजय तरुण मंडळाने सर्वप्रथम कोटमगाव येथून पायी ज्योत आणली होती. त्यानंतर गावात इतर मंडळातील तरुणांची वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातून ज्योत आणण्याची परंपरा सुरू झाली. वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या राहुल दादा मित्र मंडळाचे ज्योत आणण्याचे यंदाचे सातवे वर्ष होते. गेली सहा वर्ष मंडळातील तरुणांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राहून नवरात्रोत्सवात ज्योत आणण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. मंडळामध्ये पुरुषांसह महिलांची संख्या देखील विक्रमी असल्याने यंदाच्या वर्षी महिलांच्या नेतृत्वात ज्योत आणण्याचा बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला.

जाहिरात

त्यानुसार महिलांनी उक्कडगाव येथून ज्योत आणण्याचे ठरविले. त्यानुसार घटस्थापनेच्या दिवशी सकाळी वारी येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबेची आरती करून महिलांनी उक्कडगाव येथील रेणुका माता मंदिराकडे प्रस्थान केले. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उक्कडगाव येथून ज्योत पेटवून वारीच्या दिशेने प्रस्थान केले. अवघ्या चार तासात या महिलांनी हा प्रवास धावत पूर्ण केला. त्यानंतर सायंकाळी वारी गावातून ज्योतची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत महिलांनी पुढाकार घेतल्याने त्यांचा सन्मान म्हणून मंडळाचे मार्गदर्शक ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार रोहित टेके यांच्या संकल्पनेतून सर्व महिलांना फेटे बांधण्यात आल्याने मिरवणुकीत ते विशेष आकर्षण ठरत होते. वारी गावात पहिल्यांदाच महिलांनी ज्योत आणल्याने हा कौतुकाचा विषय होता.

जाहिरात

ज्योतला प्रतिसाद म्हणून गावातील सर्वच वयोगटातील असंख्य महिला-पुरुष महिलांवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. शेवटी जगदंबा देवी मंदिरात ही ज्योत स्थापित करण्यात आली. दसऱ्यापर्यंत ही ज्योत तेवत राहणार आहे. विशेष करून महिलांची ज्योत मिरवणूक असल्याने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ गवसने तसेच होमगार्ड अविनाश भारुड, आकाश जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्योत मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्वच महिला, पुरुष, तरुण-तरुणींनी विशेष परिश्रम घेतले.

वारी येथील राहुल दादा मित्र मित्र मंडळाच्या महिलांनी उक्कडगाव येथून ज्योत आणली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे