खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
कोपरगाव विजय कापसे दि १८ ऑगस्ट २०२४– कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला ५ लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी. नं. १७१/२०२१ दाखल केला होता.
त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधिश भगवान धों. पंडित यांनी आरोपीस ६ महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस ६ लाख ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याची सख्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अॅडव्होकेट एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.