प्रज्वल ढाकणे सन्मान योग सेवेचा सामाजिक जाणिवेचा या पुरस्काराने सन्मानित
प्रज्वल ढाकणे सन्मान योग सेवेचा सामाजिक जाणिवेचा या पुरस्काराने सन्मानित
कमी वयात योगा मध्ये वेगवेगळे सन्मान मिळविणारा म्हणून ओळख
कोपरगाव विजय कापसे दि १८ ऑगस्ट २०२४– अगदी कमी वयात योगामध्ये नावलौकिक प्राप्त केलेले कोपरगाव येथील युवायोग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे यास नुकताच अहिल्यानगर येथील स्नेहालय परिवाराच्या वतीने सन्मान योग सेवेचा सामाजिक जाणिवेचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रज्वल ढाकणे यांने विविध ठिकाणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय योग स्पर्धेत सहभाग नोंदवत वेगळे सन्मान मिळवत कमी वयात नावलौकिक मिळविला असून राष्ट्रीय योगासना स्पर्धेत २ रोप्य तर राज्यस्तरीय योगा स्पर्धेत ३ सुवर्णपदक तसेच युथ फेस्टिवल २०२४ नाशिक येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर यांच्या समोर प्रज्वलने योगासने सादर केले आहे तर आजपर्यंत अनेक शाळा महाविद्यालयात मोफत योगा प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत अनेक विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आहे या सर्व कार्याची दखल घेत अहिल्यानगर येथील स्नेहालय या संस्थेने प्रज्वल ढाकणे याचा अहिल्यानगर येथील स्नेहालय येथे नुकताच संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार भगवान रामपुरे यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रमोद कांबळे, विकास कांबळे, प्रणिता बोरा, बालाजी बल्लाळ, आदिसह अहिल्यानगर येथील शिल्पकार, चित्रकार, स्नेहालय येथील सर्व कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी मित्रपरिवार यासह योग प्रशिक्षक आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या २७३ आठवड्यापासून अविरतपणे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी स्वछता मोहीम राबविणारे गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांचे चिरंजीव असून प्रज्वल देखील आपल्या वडिलांसोबत गोदावरी नदी स्वच्छतेत व सामाजिक कार्यात सहभागी होत असतो.प्रज्वल च्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.