आपला जिल्हा

कोपरगाव रयत सेवकांची क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगाव रयत सेवकांची क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगाव रयत सेवकांची क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ३० मार्च २०२५कोपरगाव रयत टीचर्स प्रीमियर लीग – सन २०२५ , अंतर्गत क्रिकेट स्पर्धा शनिवार २२ व रविवार २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या होत्या . कोपरगाव तालुक्यात तथा जिल्ह्यात रयत सेवकांसाठी सदर स्पर्धा या प्रथमतःच आयोजित करण्यात आलेल्या होत्या .

जाहिरात

कोपरगाव रयत टिचर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील सर्व रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील एसएसजीएम वॉरियर्स , केबीपी किंग्ज इलेव्हन , सीएमके कॅपिटल्स कोपरगाव , छत्रपती वॉरियर्स अ , छत्रपती वॉरियर्स ब कोळपेवाडी , पोहेगाव टायगर्स , छावा येसगाव , रॉयल स्ट्रायकर्स रवंदे , चास चॅम्पियन्स , केडब्ल्यूबी लॉयन्स करंजी , सनरायझर्स इलेव्हन्स संवत्सर असे बारा संघ सहभागी झाले होते.

जाहिरात आत्मा

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव तालुका क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तथा अहिल्यानगर क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष के.आर.टी.पी.एल. चे मार्गदर्शक संघटक माननीय अरुणजी चंद्रे हे अध्यक्षस्थानी होते तर शिव छत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके , बेसबॉल संघटनेचे मार्गदर्शक मकरंद कोऱ्हाळकर ,एस.एस.जी.एम. कॉलेजचे प्राचार्य माधवराव सरोदे साहेब प्रमुख पाहुणे उपस्थित होते .सन्माननीय मान्यवरांनी सर्व रयत सेवक खेळाडू यांचे अभिनंदन मार्गदर्शन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .सदर शिक्षकांसाठीच्या क्रीडा स्पर्धा उपक्रमाची सर्व मान्यवरांनी स्तुती केली . याप्रसंगी डॉ.बंडेराव तऱ्हाळ , प्राध्यापक संजय शिंदे सुनील गोसावी , काशिनाथ लव्हाटे सर , बिरे सर , पोपटराव बोठे , सुरेश खंडिझोड , आप्पासाहेब आगवण , डॉ.विशाल पवार , अरविंद सालमुठे , सुनील कदम , सतीश जाधव , अरुण बोरनारे , रामचंद्र चावरे , संदिप चव्हाण , प्रविण नीळकंठ , नितीन बारगळ , दिपक भोये आदि मान्यवर उपस्थित होते .

जाहिरात

कोपरगाव तालुका अंतर्गत सर्व रयत सेवकांसाठी व सर्व रयत सेवक यांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले व त्या यशस्वी संपन्न झाल्या  या स्पर्धेत एस.एस.जी.एम. वॉरियर्स – प्रथम छत्रपती वॉरियर्स – द्वितीय केबीपी किंग्ज इलेव्हन – तृतीय या संघांनी विशेष यश प्राप्त केले. मात्र खरा यशस्वी झाला तो प्रत्येक  रयतसेवक  तसेच दिलीप भोये मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज , अंतिम साम्यातील सामनावीर पुरस्कार प्राप्त केला.बालाजी जाधव उत्कृष्ट गोलंदाज तर दिपक गावित उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

वरिष्ठ ज्येष्ठ असा कोणताही भेद न ठेवता फक्त खेळातून निर्मळ आनंद प्राप्तीचा सर्वांनीच प्रयत्न केला. नियोजनामध्ये प्रत्येकाने आपआपली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. एसएसजीएम व केबीपी परिवाराचे मैदान व आयोजनामध्ये भूमिका यशस्वी रीत्या पार पाडली. एकंदरीत स्पर्धा संयोजन आयोजन अंमलबजावणी यामध्ये प्रत्येक कोपरगाव रयत सेवक यांनी मोलाची भूमिका साकारली. त्यामुळेच स्पर्धा यशस्वी संपन्न झाल्या .

जाहिरात

सर्व सन्माननीय , पदाधिकारी , मार्गदर्शक , सहकारी व सर्व रयत परिवार यांचे कोपरगाव रयत टीचर्स प्रिमियर लीग समिती सदस्य यांच्या वतीने खूप खूप हार्दिक धन्यवाद व आभार . कोपरगाव रयत टीचर्स प्रीमियर लीग समिती अध्यक्ष नितीन निकम , सचिव राकेश खैरनार , कोषाध्यक्ष बाबासाहेब आभाळे , सहसचिव देवेंद्र भोये तसेच नियोजन समिती सदस्य विलास मोरे , अमोल चंदनशिवे , दीपक खालकर , ललित जगताप, नारायण चौरे , निखिल सलामे , वाल्मीक रौंदाळे , कैलास शेळके , राहुल गोरे , जनार्दन खेताडे यशवंत हाळे , किरण गोसावी , इद्रिस मोमीन , दिनेश चव्हाण , संदिप शेरेकर , किरण बोळीज , भाऊ बडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे