आपला जिल्हा

कोपरगावात स्वप्नवाट या दोन अंकी हृदयस्पर्शी नाटकाचा प्रयोग

कोपरगावात स्वप्नवाट या दोन अंकी हृदयस्पर्शी नाटकाचा प्रयोग
कोपरगावात स्वप्नवाट या दोन अंकी हृदयस्पर्शी नाटकाचा प्रयोग
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ फेब्रुवारी २०२६खेड्यातल्या मातीचा सुगंध, मनात स्वप्नांची धग… पण स्वप्नांच्या वाटेवर उभे असंख्य प्रश्न! आजही खेड्यातील अनेक तरुण मुलांच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न उभा आहे.लग्न का जमत नाही? शेती आहे,घर आहे, संस्कार आहेत,पण तरीही का येत नाही “होकार”?

जाहिरात
दुसऱ्या बाजूला — शिकलेली, स्वप्न पाहणारी मुलगी,तिच्या मनात अपेक्षा, स्वाभिमान आणि भविष्याची चिंता,तिचीही एक वेगळी मन:स्थिती, वेगळा संघर्ष! या ज्वलंत प्रश्नावर  आधारित  “स्वप्नवाट” हे दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक खेड्यातील मुलांच्या समस्या, शिकलेल्या मुलींची मनःस्थिती, समाजातील बदलती मूल्ये आणि लग्नसंस्थेभोवती निर्माण झालेल्या वास्तव प्रश्नांवर प्रकाश टाकते. हे नाटक फक्त मनोरंजन नाही, तर आपल्या समाजाचे आरसे आहे.

जाहिरात

प्रत्येक आई-वडिलांनी, प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक कुटुंबाने पाहावे असे विचारप्रवर्तक सादरीकरण असून चला,अनुभवूया भावनांचा, संघर्षांचा आणि आशेचा प्रवास चला, शोधूया आपल्या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शनिवार दिनांक: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक सायं  ६  कलश बँक्वेट हॉल, कोपरगाव येथे तरी जास्तीत जास्त नाटक प्रेमींनी आनंद घ्यावा.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे