संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान.

 संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ ऑगस्ट २०२४आपल्या आयुष्यात आपले आजी-आजोबा यांच्या प्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे, त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो. १९८८ मध्ये,अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली.  याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये ‘ज्येष्ठ नागिरक दिन’ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात
 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चांदगव्हाण जिल्हा परिषदच्या ज्येष्ठ माजी मुख्याध्यापिका  उषाताई भोईर या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एस.एन.एल. मधील माजी वरिष्ठ कर्मचारी ज्ञानदेव मोरे होते. तसेच शाळेच्या परिसरात राहात असलेले जेष्ठ नागरिक राजेंद्र  जंगम,साईनाथ बेकरी प्रॉडक्टचे संस्थापक साईनाथजी सोनवणे, सिव्हील इंजिनियर हेमंतजी भोईर,  शाळेचे जेष्ठ कर्मचारी चंद्रहंस पाबळे व श्रीमती पुष्पा दळवी यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.  पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे,शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे,शाळेचे कर्मचारी सचिन मोरे,विजय शिंदे व स्मिता भागडे यांनी केले.

जाहिरात
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली व माता सरस्वतीचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करून दाखअसेे. या विद्यार्थ्यांना बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले व आता तुमच्या सोबत पुन्हा शाळेय जीवन जगण्याचा आनंद घ्यावसा वाटतो. शाळेचा शंभर टक्के निकाल व मुलांची शिस्त अतिशय कौतुकास्पद आहे. असे मार्गदर्शन ज्येष्ठ माजी मुख्याध्यापिका उषाताई भोईर यांनी केले.

जाहिरात
पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी करून दिला. तसेच शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पुनम सूर्यवंशी यांनी केले तर आभार उप मुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे