संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२४- कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शुक्रवार दि २३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकणठाण येथे शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळेचे स्पर्धक विविध गटात सहभागी झाले होते.
यात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या एकूण चार मल्लांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मुलींच्या सतरा वर्षाखालील ६५ किलो वजन गटात कु.खुशबू मंडल हिने प्रथम पटकावला तर मुलांच्या ११० वजन गटात यश हाडा याने प्रथम क्रमांक पटकावला आहे व त्यांची दि.२८ ते ३० ऑगस्ट दरम्यान दादा पाटील महाविद्यालय,कर्जत येथे होणाऱ्या अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या मल्लांना शाळेचे क्रीडा शिक्षक भीमाशंकर औताडे यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले आहे.
दोन्ही विजेत्या मल्लांना कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम ,जिल्हा संपर्कप्रमुख शिवप्रसाद घोडके ,महाराष्ट्र राज्य कुस्ती मार्गदर्शक विवेक नायकल ,आत्मा मालिक कुस्ती केंद्र प्रमुख भरत नायकल ,कोपरगाव तालुका क्रीडा समिती महिला प्रतिनिधी अस्मिता रायते, संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर,कार्यकारी संचालक विशाल झावरे ,मुख्याध्यापक सचिन मोरे ,उप मुख्याध्यापिका वैशाली लोखंडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.