के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४– कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक व मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. दि. २० व २१ ऑगस्ट २०२४ या कालावधित क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगावच्या १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक व मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी जिल्हातील विविध महाविद्यालयातुन अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला होता. या स्पर्धेत विजयी झालेल्या एका विद्यार्थ्याची व दोन विद्यार्थिनिंची निवड पुणे विभागीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी झाली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को. ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड.संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदिपराव रोहमारे, प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर.सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, क्रीडा शिक्षक डॉ. सुनील कुटे, प्रा. मिलिंद कांबळे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते