सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे
सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे
सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावे -आ.आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४ :- २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महायुती शासनाने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. कोपरगाव मतदार संघातील ज्या शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामात सोयाबीन व कापसाचे पिक घेतले होते अशा अनुदानास पात्र असणाऱ्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र जोडून आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
अगोदरच अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात २०२३ च्या खरीप हंगामात कमी पर्जन्यमान होवून सोयाबीन, कापसाचे उत्पन्न घटले असतांना सोयाबीन व कापसाचे दर देखील घटले होते. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. याची महायुती शासनाने दखल घेवून शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात इतरही महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये २०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
ज्याप्रमाणे माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलात देखील आणली त्याप्रमाणेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची देखील अंमलबजावणी सुरु झाली आहे.कोपरगाव मतदार संघात जवळपास ४५ हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी असून त्यांना हि आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज उपलब्ध असून शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज भरू द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य जमा करण्यास सोयीचे होणार आहे. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले असून लाडकी बहिण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या महायुती शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे.