शैक्षणिक संस्था चालक व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची आ. आशुतोष काळे घेणार बैठक
शैक्षणिक संस्था चालक व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची आ. आशुतोष काळे घेणार बैठक
श्री साईबाबा तपोभूमीच्या हॉलमध्ये सोमवार (दि.२६) रोजी दुपारी ३.०० वाजता बैठकीचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२४ :- बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि.२६) रोजी आ.आशुतोष काळे कोपरगाव मतदार संघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक, तसेच जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेणार आहे.
बदलापूर येथील एका शाळेत अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई देखील केली जाणार आहे. परंतु अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे मतदार संघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक, तसेच जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. श्री साईबाबा तपोभूमीच्या हॉलमध्ये सोमवार (दि.२६) रोजी दुपारी ३.०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत आ. आशुतोष काळे मतदार संघातील शाळा-महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात करावयाच्या उपाय योजना याबाबत मार्गदर्शन करणार आहे.या बैठकीसाठी सर्व शैक्षणिक संस्था चालक व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.