महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगावात काळ्याफिती लावून आंदोलन; तर राज्यपालांना दिले मागण्याचे निवेदन
महाविकास आघाडीच्या वतीने कोपरगावात काळ्याफिती लावून आंदोलन; तर राज्यपालांना दिले मागण्याचे निवेदन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२४– बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विरोधी पक्षातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी संबंध राज्यभरात काळ्याफिती लावून शांततेत आंदोलन करण्याचे जाहीर केले होते त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काळ्याफिती लावून आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे राज्यपाल यांना कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्यामार्फत देत शासनाच्या कृत्याचा निषेध केला.
जाहिरात
या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे, काँग्रेसचे नितीन शिंदे यासह कैलास जाधव, भरत मोरे, अनिल गायकवाड, सनी वाघ, तुषार पोटे, संदीप देवरे, तुषार आव्हाड, अनिल लाव्हाड, मंगेश रघुवंशी, अविनाश गीते, रवींद्र कथले, सुनील वर्पे, आशिष निकुंभ, भावेश थोरात, सचिन आढाव, निखिल थोरात, पवन अग्रवाल, संतोष शिंगणे, बालाजी गोर्डे, सागर पंडोरे, प्रशांत बिडवे, पप्पू लोहकरे, गफूर शेख, रौनक अजमेरे, मधु पवार, राहुल सूर्यवंशी,गणेश जाधव, दिपक वाघ, राजू शेख, संतोष शिंगणे, बाळासाहेब रहाणे, सपना मोरे, राखी विसपुते, सौ शिगांडे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
जाहिरात
महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून लहान बालके व महिला भगिनींवरील अत्याचाराच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नुकतीच बदलापूर येथे दोन बालिकांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात मोठा विलंब केला याचा आम्ही निषेध करतो सदर प्रकरणातील आरोपीस तत्काळ फाशी द्यावी. तसेच तेथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी व राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री हे सपशेल अपयशी ठरले असून त्यांना बरखास्त करत तात्काळ राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी कोपरगाव महाविकास आघाडी च्या वतीने राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देत केली आहे.