ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमुळे विकासाला हातभार- नितीनराव औताडे
कोपरगाव तालुक्यातील गावासाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑगस्ट २०२४– शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विकास कामांना प्राधान्याने महत्त्व दिले आहे. आपल्या स्तरावर विविध योजने अंतर्गत विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. नवीनच कोपरगाव तालुक्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासनांतर्गत गावागावातील आदिवासी वस्तीचा विकास होण्यासाठी ठक्कर बाप्पा योजनेतून ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील गावागावात रस्ता दुरुस्तीसह विविध विकास कामे या निधीतून होणार आहे. यामुळे गावांच्या विकासाला हातभार लागणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख नितिनराव औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी हा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. लोखंडे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या आदेशाने कोपरगाव तालुक्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत आदिवासी वस्त्यांकरिता मूलभूत कामासाठी २०२४-२५ साठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.कोपरगाव तालुक्यासाठी दिलेल्या निधीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी आभार मानले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी , मुर्शतपुर ,मल्हारवाडी, बाहदराबाद, ,सांगवी भुसार ,सोयगाव, वेस, शहाजापुर, मळेगाव थडी ,टाकळी, मढी खुर्द ,मढी बुद्रुक ,कुंभारी, डाऊच खुर्द ,डाऊच बुद्रुक, कासली ,जवळके ,धोत्रे ,हिंगणी, माळेगाव देवी, मोर्वीस, तिळवणी, सावळगाव, सडे, भोजडे, कोकमठाण, वडगाव, कारवाडी, सुरेगाव, संवत्सर, कान्हेगांव,वेळापुर,धामोरी ,रांजणगाव देशमुख ,जेऊर कुंभारी ,वारी ,माहेगाव देशमुख, काकडी, मल्हारवाडी, चासनळी ,अंचलगाव, दहिगाव बोलका, ओगदी, घारी, चांदगव्हाण ,मनेगाव अदी गावात या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. या कामाच्या लवकरच निविदा निघणार असून गावातील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी या निधी अंतर्गत होणारे काम पारदर्शक पद्धतीने करून घ्यावे असे आवाहनही नितिनराव औताडे यांनी केले आहे