कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू
कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू
आ.आशुतोष काळेंनी केल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑगस्ट २०२४– तरुणाईसाठी अत्यंत आवडता असलेला दहीहंडी उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आ. आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या दहीहंडी उत्सवाची जबाबदारी देवून पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.
यामध्ये दहीहंडी उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सचिन गवारे यांची निवड करण्यात आली आहे.कार्याध्यक्षपदी नझीम शेख, उपाध्यक्षपदी राहुल चंवडके, राहुल शिरसाट, मोसिन सय्यद, संतोष दळवी, अनय आढाव, शुभम काळे, प्रसाद रुईकर, विजय नागरे यांची निवड करण्यात आली आहे. तर स्वागत कमिटीची जबाबदारी सुनील गंगुले, फकीर कुरेशी, बाळासाहेब आढाव, सुनील शिलेदार, मेहमूद सय्यद, दिनेश कांबळे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, मनोज नरोडे, दिनकर खरे, नवाज कुरेशी यांच्याकडे देण्यात आली आहे. स्टेज कमिटीमध्ये रमेश गवळी, मंदार पहाडे, विरेन बोरावके, कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, स्वप्निल निखाडे, संदीप पगारे, अजिज शेख, शिवाजी खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटकपदी चंद्रकांत धोत्रे, रोशन शेजवळ, सागर लकारे, सोमेश शिंदे, नितीन शेलार, संदीप देवळालीकर, शफिक शेख, दिनेश गाडेकर, तसेच सजावट समितीमध्ये धनंजय कहार, संदीप कपिले, महेश गोसावी, आकाश डागा, बाला गंगुले, वाल्मिक लहीरे कार्तिक सरदार, रोहित खडांगळे, शुभम लासुरे, ओम आढाव, हर्षल जयस्वाल, महेश उदावंत, सुरज पवार, तन्मय साबळे, ऋषिकेश खैरनार, अमोल देवकर, शुभम जोशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू केली असून दहीहंडी उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गोविंदा पथकांना दहीहंडीसाठी आवश्यक सुविधा व नागरिकांना दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोपरगाव शहरात दरवर्षी कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहीहंडीला मोठ्या प्रमाणावर होत असलेली गर्दी व दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथकांच्या अंगात उत्साह संचारला आहे.