रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची गरुड झेप
रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची गरुड झेप
रयत ऑलिंपियाड परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची गरुड झेप
अहमदनगर विजय कापसे दि २९ ऑगस्ट २०२४– रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या “रयत ऑलिंपियाड”परीक्षेत अहमदनगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अश्लेषा विवेक गहाणडुले व अद्वैत विवेक गहाणडूले हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत.या प्रत्येक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यास ३ हजार रुपये शिष्यवृत्ती संस्थेमार्फत दिली जाणार आहे.
शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयांची आवड निर्माण करणे,तर्कशक्ती, प्रयोगशीलता, निरीक्षणक्षमता, निर्मिती कौशल्ये वाढीस लावणे, संशोधक होण्याची आवड निर्माण करणे या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीने रयत ऑलिंपियाड हा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविला जातो. पहिल्या टप्प्यात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान, मानसिक क्षमता व पर्यावरणातील चालू घडामोडी या विषयावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षेतील गुणांनुसार प्रथम शंभर विद्यार्थ्यांची संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मगाव कुंभोज ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथील शैक्षणिक संकुलात दोन दिवसीय शोध प्रकल्प मार्गदर्शन शिबिरासाठी निवड केली जाते. तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थी शोध प्रकल्प सादरीकरण, प्रकल्प फाईल व मुलाखत यातील एकत्रित गुणांनुसार पर्सेंटाईल पद्धतीने अंतिम पन्नास शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची निवड करून शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये विद्यालयातील दोन विद्यार्थी आश्लेषा व अद्वैत गहाणडुले यांचा समावेश आहे याचा विद्यालयास सार्थ अभिमान व आनंद आहे, अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी दिली.
या उत्तुंग यशाबद्दल शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आश्लेषा व अद्वैत गहाणडूले तसेच मार्गदर्शक शिक्षक लांडगे सुनिता ,कारखिले मंगेश, विभाग प्रमुख महादेव भद्रे व इतर शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष आ . आशुतोष काळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अभिषेक कळमकर व अर्जुनराव पोकळे,स्कुल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर , सल्लागार समिती सदस्य डॉ. विश्वासराव काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके आदी सर्व सेवकवृंद, हितचिंतक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.