आपला जिल्हा

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्या निमित्त उद्या भंडाऱ्याचे आयोजन

श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्या निमित्त उद्या भंडाऱ्याचे आयोजन
श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्या निमित्त उद्या भंडाऱ्याचे आयोजन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑगस्ट २०२४हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्व असून या महिन्यात जगभरातील अनेक हिंदू बांधव आपपाल्या परीने देवाची पूजापाठ करत असतात. या काळात जगभरातील सर्व देव-देवतांची मंदिरे भाविकांनी अक्षरशः फुलून गेलेली असतात. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरात देखील मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने  गेल्या १८ वर्षापासून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते.या वर्षी आयोजित केलेल्या या पारायण सोहळ्यानिमित्ताने शुक्रवारी भव्य अशा महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यंदा या सोहळ्याचे हे १९ वे वर्ष असून शहरातील सुवर्णकार भवन सराफ बाजार या ठिकाणी गुरुवार दि २२ ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेल्या या पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून सलग नऊ दिवस सुरू या पारायण सोहळ्याच्या सांगते निमित्ताने श्री सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम समाधीस्थान कोपरगाव बेट येथील मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने  शुक्रवार दि ३० ऑगस्ट २०२४ रोजी   शहरातील श्री संत नरहरी विठ्ठल मंदिर सराफ बाजार येथे महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्या समाप्ती निमित्ताने आयोजित करण्यात आलेला महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे