आपला जिल्हा

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे काळाची गरज – आ. आशुतोष काळे

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे काळाची गरज – आ. आशुतोष काळे

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे काळाची गरज – आ. आशुतोष काळे

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ५ जुन २०२६-  पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. हवामान  बदलाचे संकट आणि वाढते तापमान यावर मात करायची असेल तर प्रत्येकाने हरित पर्यावरणासाठी वृक्षारोपण करणे आणि आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचा दृढ संकल्प करणे काळाची गरज असल्याचे मत आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत परिसरात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी व्यक्त केले.

जाहिरात

औद्योगिक आणि सामाजिक प्रगती साधत असताना आपण निसर्गाचे देणे लागतो ही भावना विसरून चालणार नाही. कारखान्यासारख्या औद्योगिक परिसरात हरित पट्टा निर्माण केल्याने प्रदूषण नियंत्रणात मोठी मदत होते. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करून ती जगवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यावर्षी शासनाने पर्यावरण दिनानिमित्त पृथ्वी देत असलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, हवामानासाठी त्वरित कृती करणे गरजेचे असल्याची संकल्पना ठरवली आहे. प्रत्येकाने या संकल्पनेचा गांभीर्याने विचार करून एक नागरिक एक झाड ही संकल्पना प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवण्याचे आवाहन यावेळी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थितांना केले.

जाहिरात

याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे