आपला जिल्हा

संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्यु. कॉलेजचे ११ खेळाडू जीत कुणे डो स्पर्धेत जिल्ह्यात  प्रथम

संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्यु. कॉलेजचे ११ खेळाडू जीत कुणे डो स्पर्धेत जिल्ह्यात  प्रथम


सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांच्या सरावांचे संजीवनीचे फलित

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २४ डिसेंबर  २०२५संजीवनी सैनिकी स्कूल  अँड  ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय जीत कुणे डोे स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटात मार्शल  आर्टचे कसब दाखवत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे  पारणे फेडले. यात संजीवनीच्या २० पैकी ११ खेळाडूंची सोलापुर येथे होणाऱ्या  विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा कोपरगांव येथिल तालुका क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जीत कुणे डोे असोसिएशन, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आल्या होत्या. संजीवनी मध्ये सर्व प्रकारांच्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण  दिल्या जात असल्यामुळे येथिल खेळाडूंना यश  प्राप्त होत आहे, अशी  माहिती संस्थेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

पत्रकात पुढे म्हणाले आहे की जीत कुणे डोे ही ब्रूसली यांनी स्थापन केलेली एक मार्शल  आर्ट आहे, जी कोणत्याही एका शैलीवर  अवलंबून न राहता सरळ आणि प्रभावी तंत्रावर भर देते, ही स्व संरक्षणाची प्रणाली आहे, जी परिस्थितीनुसार कोणत्याही मार्शल  आर्टमधिल सर्वोत्तम तंत्राचा वापर करण्यास शिकविते. ज्यात विंग चुन, तायक्वांदो आणि बॉक्सिंगचा समावेश  आहे. कोपरगांव येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध गटातुन सुमारे २०० पेक्षा अधिक स्पर्धक आले होते.

जाहिरात

जीत कुणे डोे या स्पर्धेत संजीवनीचे ११ खेळाडू जिल्हा पातळीवरून विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले. यात पवन राजीव आरोटे, धिरज आण्णा गायकवाड, खुशल पांडुरंग सदगीर, ओम किरण आहेर, आकाश  गणेश  कळमकर, आकाश संजय देशमुख, ओंकार गबाजी कांगणे, जयेश  बाळुबा महाले, युवराज कानिफनाथ कळमकर, वैभव संपत दिघे व प्रेम माधव चव्हाण यांचा समावेश आहे.संजीवनीच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरीय स्पर्धेत केलेली कामगिरी ही त्यांच्या दैनंदिन  कठोर सरावाचा आणि चिकाटीचा पुरावा आहे. संस्थेचा सर्व क्रीडा प्रकारांसाठी क्रीडा प्रशिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन  आणि शाळेच्या व्यवस्थापनाची क्रीडा संस्कृती वाढविण्याची भूमिका यामुळे उल्लेखनिय यशाचा  पाया मजबुत होत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे. संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व खेळाडू, प्राचार्य कैलास दरेकर व प्रशिक्षक  सुदर्शन  पांढरे यांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे