आपला जिल्हा

युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव मोहीम केली सुरू 

युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव मोहीम केली सुरू 
स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव मोहीम सुरू
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ डिसेंबर २०२५युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव स्वच्छतेला नवी दिशा मिळणार आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधत ठोस पावले उचलली जात असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे मत विवेकभैय्या कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांनी व्यक्त केले.

जाहिरात
तात्काळ कोपरगाव शहरातील स्वच्छता हा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. याच अनुषंगाने कोपरगाव नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.शहर स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य व साधनांची कमतरता, ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सुविधा, उपलब्ध वाहने तसेच कंत्राटी पद्धतीवर कार्यरत महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगानुसार वेतन न मिळण्यासारख्या गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.तुम्ही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवा तुमचे प्रश्न आम्ही सोडवू हा विश्वास विवेकभैय्या कोल्हे यांनी दिला.

जाहिरात
या सर्व बाबींवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, तसेच स्वच्छता कर्मचारी बांधवांच्या हक्कांसाठी नगरपरिषद ठामपणे उभी राहील,असा विश्वास यावेळी देण्यात आला. नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील नगराध्यक्षांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत असून, शहर स्वच्छतेसाठी नवे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ कोपरगांव सुंदर कोपरगांव या शहरव्यापी स्वच्छता मोहिमेचे आयोजन दिनांक २५ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच शाळा व महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी किमान एक तास शहर स्वच्छतेसाठी देत १ तास माझ्या कोपरगाव शहरासाठी ही महत्वपूर्ण मोहीम ठरणार आहे. स्वच्छतेदरम्यान काढलेले फोटो किंवा व्हिडिओ Vision Kopargaon या इन्स्टाग्राम व फेसबुक पेजला टॅग करण्याचे आवाहन करण्यात आले असून, चला, एकत्र येऊया आणि स्वच्छ, सुंदर कोपरगाव घडवूया, असा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे