आपला जिल्हा
साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची जल्लोषात सांगता
साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची जल्लोषात सांगता
युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुंबादेवी तरुण मंडळ, समस्त सुवर्णकार समाज, कोपरगाव आणि कोपरगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल यांचे केले कौतुक
कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२४– कोपरगाव शहरातील प्रसिध्द मुंबादेवी तरुण मंडळ व समस्त सुवर्णकार समाज, कोपरगाव आणि कोपरगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल यांच्या सौजन्याने आयोजित साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवार दि ३० ऑगस्ट रोजी मोठया जल्लोषात श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
कोपरगाव येथे आयोजित केलेल्या साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे हे १९ वे वर्ष होते गेल्या ८ दिवसापासून सुरू असलेल्या या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या तर शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी समाप्ती च्या दिवशी भव्य महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता कोपरगाव शहरातील संत नरहरी विठ्ठल मंदीर,पांडे गल्ली या ठिकाणी आयोजित केला होता या प्रसंगी कोपरगांव तालुक्याचे युवा नेते तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी कोपरगावचे माजी उपनगराध्यक्ष योगेश तुळशीदास बागुल, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, कैलास जाधव, ज्ञानेश्वर माऊली गोसावी, भाऊसाहेब बागुल, राहुल आढाव, शरद कुलकर्णी, संजय मंडलिक, पप्पू पडीयार, रंजन जाधव दत्ता उदावंत, दत्ता काले, विक्रमादित्य सातभाई, नंदू देवळालीकर, निखिल जोशी, गौरव लहुरीकर, कुणाल लोणारी, अनिल जाधव, तुळशीदास भाऊ, प्रकाश दुसाने, सुनील पांडे, संतोष चव्हाण, बंटी दळवी, राहुल खडांगळे, मयूर खडांगळे , ओम बागुल, प्रकाश भडकवाडे, सनी वाघ, कलविंदरसिंग डडियाल, रविंद्र कथले, प्रीतीश जाधव, दत्ता जाधव, आदित्य लोणारी, शुभम भावसार, पद्माताई बागुल, कविता गोसावी, प्रतिभा कुलकर्णी, रश्मी आढाव, अंबिका भजनी मंडळआदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.