कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…
कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…
कोपरगावात बैलपोळा उत्साहात साजरा…
कोपरगाव विजय कापसे दि २ सप्टेंबर २०२४– कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेस येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, कोपरगांव नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल,सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, संगिताताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,गोसेवक धनंजय जोशी यांचे उपस्थिती सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पध्दतीने अभिषेक पुजा आणि आरती संपन्न झाली.त्या नंतर वेशीचे पुजन करण्यात येवून पोळा फोडण्यात आला.वेशी जवळील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेवून शेतकरी बैलजोडी सह सोमेश्वर महादेव देवस्थान येथे आले.तेथे श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने बैलजोडी पुजन करण्यात आले.या प्रसंगी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके,कोपरगांव नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल,सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,सौ.संगिताताई पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, गोसेवक धनंजय जोशी व्यवस्थापन समितीचे सदस्य जयंत विसपुते, महावीर शिंगी, पौरोहित्य संजय रोडे,नंदू शेंडे गुरव,रमेश जंगम,निवृत्ती वाघमारे, दत्ता काले,संतोष साबळे, सुनिल फंड, निलेश उदावंत,मनोज कपोते,सुधाकर जाधव, प्रदिप मते, कुणाल लोणारी,गौरिष लहुरीकर, राहुल देवळालीकर,संतोष चवंडके,कैलास आढाव, मनोज नरोडे, विकी जोशी,सर्वज्ञ जोशी,राहुल आदमाने,ज्ञानेश्वर चाकणे, प्रेमकुमार गायकवाड, संजय तिरसे, स्वप्निल जाधव,आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,विभाग प्रमुख मनोज लोट, निलेश,बुचकुले, यांचे सह कोपरगाव नगरपरिषदे अधिकारी व कर्मचारी, सोमेश्वर महादेव देवस्थानचे भक्त,ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने उपस्थित यजमान शेतकरी कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी यांचा पारंपरिक टोपी उपरणे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आहे.गोवंश बैल जोपासणारे मानकरी शेतकरी डॉ.शांताराम पाटील आढाव,सर्जेराव त्रिभुवन, विजय सोळसे, मयुर जगताप,संतोष चवंडके यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आढाव पाटील परिवाराचे वतीने विजयराव आढाव पाटील यांनी आदर्श आणि देखणा बैल म्हणून विशेष बक्षिस जाहीर केले.
श्रीमंत पवार सरकार संस्थानने उभारलेल्या कोपरगाव वेसची फुलांचे तोरण,रांगोळी सजावट करण्यात आली होती.तुतारी सनई-चौघड्यांचे स्वर,गायक दौलतभाऊ शिरसाठ यांचे शिवभक्ती गीत याने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते.कोपरगांवचा पारंपरिक बैलपोळा पहाण्यासाठी बालगोपाळांसह अबाल वृध्द ग्रामस्थांनी गर्दी केली होती.गोवंश बैल मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक वर्षांनी असा बैल पोळा ग्रामस्थांनी अनुभवला आहे.
कोपरगाव शहर गांवठाण वेस
श्रीमंत पवार सरकार यांनी बांधलेले कोपरगाव नगरीचे प्रवेशद्वार म्हणजेच कोपरगाव वेस… गोदावरी नदी तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचे जुने गावठाण भागात शेकडो वर्षांपूर्वी १७ व्या शतकात कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत पवार सरकार यांनी कोपरगावचे प्रवेश व्दारे म्हणून कोपरगावची वेस बांधली आहे. सदर वेस दोन्ही बाजूने दगड आणि चुना याची भक्कम भिंत बांधली आहे. वेशीच्या आतिल बाजुस शिपायांना बसण्यासाठी देवडी आहे. वेशीवर जाण्यासाठी एका बाजूने दगडी पायऱ्या आहेत. वेशीवर तेल्यासाग या लाकडातील आकर्षक नक्षीकाम असलेली कमान होती. वेशीचे द्वार शिवकालीन पध्दतीचे होते. प्रवेशद्वाराला मोठे लोखंडी साखळदंड होते. वेशीत रात्रीचे वेळी दिवे लावण्याची देवळी आहे. श्रीमंत महामहीम पवार सरकार यांच्या जहागिरीमुळे बैलजोडीचा श्रावणी बैलपोळा सणाला मानाचे स्थान होते. श्रीमंत पवार सरकार यांचे बैलजोडीला आकर्षक बाशिंग, सुंदर नक्षीकाम असलेली झुल असे सजवलेली मानाची बैलजोडी कोपरगावचे आकर्षण होती. पोळ्याच्या दिवशी मानाचा बैलाच्या पायाला नाडा बांधत असे. पारंपारिक वाद्य वाजविले जात. बैलाने पायाने नाडा तोडून वेशीतून आत प्रवेश केल्यावर पोळा फुटला असे मानले जात असे. त्या मागोमाग गावकऱ्यांची सजवलेली बैल वेशीतून जात असे. कोपरगांवचे पोलिस पाटील बाबुराव पाटील यांचे पुत्र महेंद्र पाटील घराण्याकडे श्रीमंत पवार सरकार संस्थानचा परंपरागत कारभार आहे. बैलपोळ्याला आजही बैलजोडी पुजन, नेवेद्य आणि शेतकऱ्याचा सन्मान केला जातो. परंपरागत उत्सवाचे दरम्यान वेशी समोर पारंपरिक वाद्य वाजविणे. वेशीचे पुजन करण्याची परंपरा आजही कायम आहे.