आपला जिल्हास्वछता दूत घोडके

शुष्क वातावरणात कराओके सिंगर्सचे ओलावा देण्याचे काम- पद्मकांत कुदळे

शुष्क वातावरणात कराओके सिंगर्सचे ओलावा देण्याचे काम- पद्मकांत कुदळे

कराओके सिंगर्स क्लब, कोपरगांव प्रथम वर्धापनदिनानिमित्त म्युझिकल काॅन्सर्ट मराठी,हिंदी गाण्यांचा विशेष कार्यक्रम

कोपरगाव विजय कापसे दि ३सप्टेंबर २०२४राजकारण आणि बदलती सामाजिक परिस्थिती लक्षात घेता निर्माण होणाऱ्या शुष्क वातावरणात रसिकांचे मनाला कराओके सिंगर्सचे ओलावा देण्याचे काम करत असल्याचे गौरव उद्गार माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी एका कार्यक्रमात काढले.

जाहिरात

धकाधकीच्या सार्वजनिक जीवनात मनाला निख्खळ आनंद देण्याच्या उद्देशाने कराओके सिंगर्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त म्युझिकल काॅन्सर्ट मराठी,हिंदी गाण्यांचा अंतर्नाद या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

जाहिरात

या प्रसंगी सारेगमप लिटिल चॅम्प विजेती गौरी पगारे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, गायक प्रा. अविनाश घैसास,३५ हजार गाण्यांचे संग्राहक पेंटर मोहंमदसाहब दारूवाला,कराओके सिंगर्स क्लबचे संस्थापक सुधीर (राजु) कोयटे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके ,आश्विनकुमार व्यास,जेष्ठ विधिज्ञ अॅड. जयंत जोशी,प्रगतशील शेतकरी केशव भवर,डॉ.निलेश गायकवाड,कवयित्री ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांचे सह रसिकश्रोते उपस्थित होते.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नाट्य देवता पुजन दीप-प्रज्वलन करुन सारेगमप लिटिल चॅम्प विजेती गौरी पगारे हीचे गणेश वंदनेने गायन मैफिलीचा शुभारंभ करण्यात आला.

जाहिरात

म्युझिकल कॉन्सर्ट मध्ये सहभागी गायक आणि गायिकांमध्ये सुधीर (राजू) कोयटे,प्रा.डॉ. धनंजय क्षीरसागर,अनिल गिड्डे,प्रा. हरेश चौधरी, कल्याणी बनसोडे,विवेक बिडवे,अनिल जगताप, संगीता बनसोडे,प्रा.डॉ. लक्ष्मीकांत धामंदे,रवी पाटील, वसंतराव शिलेदार,नितीन वाघ, अॅड. नरेंद्र संचेती, डॉ. अरुण भांडगे,अजित कोठारी,संजय मंडलिक,प्रवीण सोमवंशी, प्रा. मिलिंद मुखेडकर,वर्षा सोनवणे,डॉ. सोनिया रणदिवे,डॉ. सुषमा आचारी, डॉ. सतीश भोकरे, प्रमोद को-हाळकर,राहुल लांडे,इरफान शेख, ॲड.श्रद्धा जवाद, सुरेखा बिबवे,डॉ. विलास आचारी,राजेंद्र सोनवणे,प्रा.डॉ. शैलेंद्र बनसोडे,सचिन अमृतकर, प्रा. तुकाराम डरांगे, वृंदा कोऱ्हाळकर,बलभिम उल्हारे, गीताश्री राठोड, राजेंद्र जवाद,सतिष गर्जे,वैशाली उल्हारे,डॉ. समीर शहा,रूपाली भोकरे, प्रा.डॉ. बी. आर. शिंदे,डॉ. सर्वेश बिडवे, नेतल काबरा,इलियास सय्यद, राजेंद्र वाघ,सादिक पठाण, डॉ. निलेश काबरा, इशिता बनसोडे,आदर्श बिडवे यांनी गायन केले. निवेदन अजित कोठारी, प्रा.शैलेंद्र बनसोडे, सुधीर (राजू) कोयटे,धनंजय क्षिरसागर, तुकाराम डरांगे यांनी केले.

जाहिरात

उपस्थितांचे स्वागत सुधीर कोयटे यांनी तर सुत्रसंचलन प्रा. तुकाराम डरांगे यांनी केले. शेवटी आभार राजेंद्र सोनवणे यांनी मानले.कार्यक्रमास गायकांचे कुटुंबिय आणि रसिकश्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे