आपला जिल्हा
शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या-मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी
शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या-मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी

संगमनेर विजय कापसे दि १ जानेवारी २०२६–यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन जास्त असून सर्वत्र युरियाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तरी शासनाने तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.