नायब तहसीलदार सातपुते यांची करंजी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट
नायब तहसीलदार सातपुते यांची करंजी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट
नायब तहसीलदार सातपुते यांची करंजी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट

कोपरगाव विजय कापसे दि ३ सप्टेंबर २०२४ – कोपरगावच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी ग्रामपंचायत कार्यालयास सदिच्छा भेट देत शासनाच्या सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, गावचे सरपंच रवींद्र आगवण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष भिंगारे, माजी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आगवन, डॉ.सुनील देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, दादासाहेब भिंगारे, दशरथ जोर्वेकर, कृष्णा शहाणे, माधव जोर्वेकर, गणेश मच्छिंद्र भिंगारे आदि ग्रामस्थांसह करंजी गावातील पैठणी कारागीर तसेच महिला उपस्थित होत्या.

या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार सातपुते यांनी शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेचा आढावा घेत जास्तीत जास्त पात्र योग्य लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपस्थित असलेल्या पैठणी विणकाम कारागीर युवकांना शासनाच्या योजनांचे मार्गदर्शन करत त्यांच्या पैठणी केंद्रास भेट दिली तर ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या ५ रुपये दुधाच्या अनुदानाबाबत तसेच तीन महिन्यापूर्वी करंजी परिसरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या भरपाई बाबतच्या प्रश्नांचे निरसन नायब तहसीलदार सातपुते यांनी केले तर करंजी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रविंद्र आगवन यांनी नायब तहसीलदार सातपुते व माजी नगराध्यक्ष पाटील यांचा सन्मान केला.

कुठल्याही तज्ञांचे मार्गदर्शन नसताना करंजी या ग्रामीण भागातील युवकांचे पैठणी तयार करण्याच्या कलेतील ज्ञान अप्रतिम असून नक्कीच ते भविष्यात उत्कृष्ट पैठणी कारागीर होऊन व्यवसायिक होऊन आपल्या गावाचे नाव उज्वल करू शकतात
माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील






