आत्मा मालिक गुरुकुलात बैलपोळा जल्लोषात साजरा
आत्मा मालिक गुरुकुलात बैलपोळा जल्लोषात साजरा
आत्मा मालिक गुरुकुलात बैलपोळा जल्लोषात साजरा
येवला प्रतिनिधी दि ३ सप्टेंबर २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलात बैलपोळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य तुषार कापसे, मठाधिपती संत कंकाली बाबा उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमापूजन केलेे.सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या फोटोचे आणि बैलांचे पूजन करण्यात आले. बैलांना गुळ, बाजरी व शेंगदाण्याच्या पोळीचा नैवेद्य दाखवला. सोनाली घोडके यांनी बैलपोळा विषयी माहिती सांगितली.त्यात त्यांनी सांगितले की महादेव व पार्वती यांच्यामध्ये जेव्हा सारीपाठाचा डाव चालू होता त्यावेळी नंदी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जेव्हा महादेवांनी विचारलं की हा डाव कोण जिंकले तर नंदिनी महादेवांची बाजू घेतली त्यामुळे पार्वती मातेला राग आला आणि पार्वती मातेने नंदीला शाप दिला की या पृथ्वीतलावर कायमस्वरूपी तुझ्या मानेवरती जु असेल.म्हणजे तुला काम करावे लागेल. नंतर पार्वती मातेलाच नंदीची दया आली आणि त्यांना उशाप दिला आणि सांगितले की वर्षातून एक दिवस शेतकरी राजा तुझी मनोभावे पूजा करील, त्या दिवशी तुला कामापासून सुटका असेल.तोच हा दिवस म्हणजे बैलपोळा या दिवशी शेतकरी बैलांना सजवतात त्यांची गावातून मिरवणूक काढतात. पुरणपोळी खाऊ घालतात.
प्राचार्य तुषार कापसे यांनी देखील सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.बैलपोळा विषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा जोरी यांनी केले व आभार प्रदर्शन मनीषा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री खानापुरे, सुजाता हेडगिरे, वैशाली पवार ,मोनालि सोनवणे, दिपाली टोर्पे ,वर्षा गवळी ,पौर्णिमा वाघ, वैष्णवी गायकवाड ,प्रीती शिरसाट ,सोनाली परदेशी ,कोमल जाधव ,श्रद्धा तूपसाखरे ,पूजा शेलार,लुलेकर मावशी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.