आयुर्वेद सेवा संघ मातृसंस्थेद्वारे डॉ. रामदास आव्हाड यांचा सन्मान
आयुर्वेद सेवा संघ मातृसंस्थेद्वारे डॉ. रामदास आव्हाड यांचा सन्मान
कोपरगाव विजय कापसे दि ४ सप्टेंबर २०२४– नाशिक येथील शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या “आयुर्वेद सेवा संघ” या मातृसंस्थेने “महर्षि चरक जयंतीचे औचित्य साधून आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात नाशिकचे माजी उपमहापौर अजय बोरस्ते व संघाचे अध्यक्ष डॉ. अंबादास कुलकर्णी यांच्या शुभहस्ते तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य राष्ट्रीय आयुर्वेदगुरू डॉ. रामदास आव्हाड यांना आयुष मंत्रालय भारत सरकार, दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२३ चा “राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार” मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. आव्हाड यांचे “दैनंदिन चिकित्सेत पंचकर्माचे महत्व” या विषयावर व्याख्यानही झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष यार्दी, सचिव डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. रजनी गोखले, माधव परांजपे व संस्थेचे पदाधिकार्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्य, विद्यार्थी, कर्मचारी व आयुर्वेद प्रेमी उपस्थित होते.
आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा मातृसंस्थेने केलेला सत्कार हा सर्वात मोठा सन्मान आहे, कारण ज्या महाविद्यालयातून मी आयुर्वेदाचे शिक्षण घेतले त्याच संस्थेच्या महाविद्यालयात महर्षी चरक जयंतीच्या दिवशी सन्मान होणे जास्त आनंददायी.डॉ. रामदास आव्हाडराष्ट्रीय आयुर्वेदगुरू