कोल्हे गट

धक्कादायक प्रकार,पाण्याच्या श्रेयासाठी कोपरगावकर वेठीस – राजेंद्र सोनवणे

धक्कादायक प्रकार,पाण्याच्या श्रेयासाठी कोपरगावकर वेठीस – राजेंद्र सोनवणे
धक्कादायक प्रकार,पाण्याच्या श्रेयासाठी कोपरगावकर वेठीस – राजेंद्र सोनवणे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ सप्टेंबर २०२४मुबलक पाऊस गेले काही पावसाळे पडतो आहे.अतिवृष्टी सारखी वेळ येऊनही कोपरगाव शहराला मात्र आठ दिवसाआड पाणी का दिले जाते याचा शोध घेतला असता काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. पाणीसाठा असताना देखील नागरीकांना आठ दिवसांनी पाणी मिळते अशी जनभावना तयार केली. त्यानंतर मात्र पाच नंबर तलाव पूर्ण करून आम्हीच कसे पाणी चार दिवसांनी देतो असे दाखवण्यासाठी आमदार काळे यांच्याकडून नागरिकांच्या भावनांशी खेळले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा घणाघात माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केला आहे.

जाहिरात

गेले तीन ते चार वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते,नागरिक,राजकीय पदाधिकारी यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशास नाकडे किमान चार दिवसांनी पाणी द्या अशी मागणी केली होती.मात्र वारंवार खराब आणि दूषित पाणी मिळूनही वेळ मारून नेण्याचे काम केले गेले.पाणीपुरवठा करणारे तलावात मुबलक पाणी असूनही प्रशासन शहराला आठ दिवसांनी पाणी पुरवत होते.अधिकाऱ्यांना तशा प्रकारे तंबी देऊन नकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी सूचना होत्या का ? पालिकेचा वापर करून निवडणुका जवळ आल्यानंतर पाण्याचे दिवस कमी करून राजकीय श्रेय मिळवण्याचा प्रकार आहे मात्र जनतेसमोर हे नाटक उघडे पडले आहे.

जाहिरात

नैसर्गिक पर्जन्यमान चांगले असल्याने मुळातच चार दिवसांनी पाणी देणे शक्य होते.गेले काही काळ पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत होता मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

जाहिरात

स्वतः नकारात्मक वातावरण करायचे आणि नंतर आपणच त्यावर कसे काम करतो हे दाखविण्यासाठी जनतेला भुलवायचे असा गंभीर प्रकार समोर आला आहे.पाणी जर यापूर्वी चार दिवसाआड मिळाले असते तर महिलांचा त्रास कमी झाला असता व बाजारपेठेत देखील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना झळ बसली नसती.एका श्रेयावादासाठी प्रशासनाचा गैरवापर झाला असून अनेकांच्या भावनांशी खेळून जनतेचे नुकसान झाले आहे अशी टीका…यांनी केली आहे.

राजेंद्र सोनवणे
 आठ दिवसांपासून या विषयावर अनेकांनी पालिकेची संपर्क केला असता मुख्याधिकारी महोदय हे रजेवर निघून गेले असल्याची बाब समोर आल्याने पाण्याचे राजकीय षडयंत्र उघड पडले आहे.पालिका कर्मचारी संपावर आहे,शहरात विविध आजाराने नागरिक त्रस्त आहे आणि गटारीचे पाणी घरात घुसत असताना हे प्रश्न सोडविण्याचे गांभीर्य मुख्याधिकारी यांना नाही – राजेंद्र सोनवणे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे