के जे सोमय्या कॉलेज

सोमैय्या महाविद्यालयाच्या गोदातरंगच्या ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांकाचे प्रकाशन संपन्न’

सोमैय्या महाविद्यालयाच्या गोदातरंगच्या ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांकाचे प्रकाशन संपन्न’

शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी  शिरीष वमने यांच्या हस्ते संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १० सप्टेंबर २०२४२१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिकीकरणाचे शतक आहे.  सोशल मीडियाच्या क्षेत्रातील अचंभित करणारी प्रगती ही कधी कधी चिंता करायला लावणारी आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉग, अशा ॲपसमुळे युवकांमध्ये वाढलेली कनेक्टिव्हिटी आज पदोपदी दिसून येते. त्याचे  फायदे जरी असले तरी काही तोटे देखील आहेत. सायबर क्राईम हा त्याचाच एक दुष्परिणाम होय. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या  घटनांच्या पार्श्वभूमीवर के. जे.सोमैया महाविद्यालयाने प्रकाशित केलेला ‘गोदातरंग’ वार्षिककांचा ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांक’ आज माझ्या हस्ते प्रकाशित होतो आहे, ही माझ्यासाठी मी सुवर्णसंधी समजतो असे प्रतिपादन शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी कोपरगाव येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित ‘गोदातरंग’ प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

 कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या   या सोहळ्याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी वमने पुढे म्हणाले की, गोदातरंगचा भारतीय महिला सुरक्षा विशेषांक मी आद्योपांत चाळला. मुखपृष्ठापासून ते मलपृष्ठापर्यंत अंकाची मांडणी अत्यंत सुरेख आणि समर्पक झालेली असून यातील विद्यार्थ्यांचे लेखन नक्कीच आश्वस्त करणारे आहे. एकूणच अंक उत्तम झालेला असल्याचे सांगितले.

जाहिरात

कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की,  महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ‘गोदातरंग’ वार्षिकांक हा त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम होय.  ‘महिला सुरक्षा’ हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे . आमच्या महाविद्यालयात दरवर्षी विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय असते. त्या दृष्टीने महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देते. असल्याचे सांगत रोहमारे यांची या अंकाची सुंदर मांडणी केल्याबद्दल संपादक मंडळाचे  अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. सी. ठाणगे म्हणाले की, ‘गोदातरंग’ वार्षिकांकाला गेल्या साठ वर्षांची सोनेरी परंपरा लाभलेली आहे. या अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधून अनेक लेखक, कवी आणि पत्रकार देखील घडलेले आहेत. अंकाच्या संपादकांची परंपरा देखील मोठी आहे. ना. स. फरांदे, प्रा. अनिल सोनार, डॉ. वासुदेव मुलाटे, न. र. गुळगुळे आदी अनेक मान्यवर प्राध्यापकांनी या अंकाचे संपादन करून नावलौकिक प्राप्त करून दिलेला आहे. आजही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे असे अभिमानाने सांगावे असे वाटते.

याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते ‘गोदातरंग’ च्या ‘भारतीय महिला सुरक्षा विशेषांकाचे’ दिमाखात प्रकाशन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते संपादक मंडळाचा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या डॉ. बापूसाहेब भोसले, डॉ. शैलेंद्र बनसोडे,  एम. व्ही. कांबळे आणि यशस्वी क्रीडापटू विद्यार्थ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

Oplus_131072

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रमुख संपादक प्रो. डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभांना वाव देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने  ‘गोदातरंग’ वार्षिकांक  प्रकाशित केला जातो. या माध्यमातून आजपर्यंत ‘स्त्रीभ्रूण-हत्या’, ‘संत साहित्य’, ‘समाज माध्यमे’, ‘कोरोना महामारी’, ‘के. बी. रोहमारे जन्मशताब्दी’, ‘जागतिक तापमानवाढ’, ‘हवामान बदल’ आदी अनेक विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यातील अनेक अंकांना आकर्षक पारितोषिके देखील प्राप्त झालेली असल्याचे सांगितले तर या प्ररसंगी अंकाचे विभागीय संपादक प्रो. डॉ. संजय अरगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर इंग्रजी विभागाच्या संपादक प्रा. वर्षा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संपत आहेर, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. रावसाहेब गायकवाड, रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे