संजीवनी महिला बचत गट आयोजित जेऊर पाटोदा येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात साजरा
महिला शक्तीचा सन्मान हाच खरा उत्सव – स्नेहलताताई कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि १० सप्टेंबर २०२४- संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम जेऊर पाटोदा येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मा.आ स्नेहलताताई कोल्हे या उपस्थित होत्या.युवानेते विवेकभैय्या कोल्हे व रेणुकाताई कोल्हे यांनी नारीशक्तीचा गौरव होण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्तुत्य उपक्रमाचे विविध गावांमध्ये आयोजन केले आहे.
महिला बचत गटाच्या माध्यमातून संघटन उभे करून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करता आले.परिस्थितीशी लढणाऱ्या स्री शक्तीला आपल्या ऐक्याची ताकद बचत गटांमुळे जाणवली.कौटुंबिक कामकाज करताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पैशांची बचत व बँकेचे व्यवहार महिला प्रभावीपणे करतात हे सिद्ध झाले.
राजमाता जिजाऊ,अहिल्यादेवी होळकर,माता रमाई,सावित्रीबाई फुले यासारख्या आदर्श स्त्री शक्तीचा आपल्याला वसा आहे.मलाही एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सर्व भगिनींची मोठीं साथ मिळाली.प्रामाणिक काम करणे हा आपला महिलांचा स्वभाव असतो.अलीकडे महिला अत्याचाराच्या घटना आपण ऐकतो त्यासाठी खंबीर होऊन आपल्याला अशा प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी सक्षम बनावे लागेल.असे सामाजिक उपक्रम घेतो आपण त्यातून स्री शक्तीचे ऐक्य जपतो त्यामुळे महिला शक्तीचा सन्मान हाच खरा उत्सव म्हणून जपला जाणे काळाची गरज आहे.