समता पतसंस्था
समताचा आजचा विद्यार्थी स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करणारा असेल – खासदार वाकचौरे
समताचा आजचा विद्यार्थी स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करणारा असेल – खासदार वाकचौरे
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते समताज रोबोजिनीअस सेंटरचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १५ सप्टेंबर २०२४ : आधुनिक शिक्षण व नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना होणे गरजेचे बनले आहे. समता इंटरनॅशनल स्कूलने तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व ओळखून ‘समताज रोबोजिनीअस सेंटर’ ची सुरुवात करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर घातली आहे. या सेंटरमुळे रोबोसारख्या तंत्रज्ञान युक्त व्यक्तिमत्त्वाची ओळख विद्यार्थ्यांना होणार असून नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचा आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करणार असल्याचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘समताज रोबोजीनिअस सेंटर’ चे उद्घाटन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
या वेळी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य ॲड. संदीप वर्पे, सामाजिक कार्यकर्ते रोहित वाकचौरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थिती होते. या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी प्रास्ताविकातून समताचा दिवसेंदिवस उंचावत असलेल्या प्रगतीच्या आलेखाविषयी माहिती देत, समता इंटरनॅशनल स्कूल हे ज्ञानपीठ बनले असून समताचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत असून परदेशातही आपला ठसा उमटवत आहे. भविष्यातही समताचा विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा परिपाक असेल. तसेच कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी विद्यार्थ्यांना बचत ठेव योजनेविषयी माहिती देऊन बचतीचे महत्त्व समजावून सांगितले.
प्राचार्य डॉ.विनोद चंद्र शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. अक्षत मिश्रा या विद्यार्थ्याने मनोगतातून रोबोचे महत्त्व सांगितले. ईशान कोयटे, इप्सिता राय, द्रिष्टी लोकचंदानी, कलश बागरेचा, रणवीर मांजरे, श्रीनिवास मोरे, हासीम शाद या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने रोबोविषयी प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देशना अजमेरा व दृष्टी ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार धनश्री पोरवाल हिने मानले.
समता इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीने समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून समताच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानदा बचत ठेव योजने’ चा शुभारंभ करण्यात आला आहे. बाल वयातच बचतीची सवय विद्यार्थ्यांना व्हावी. यासाठी ज्ञानदा बचत ठेव योजनेचा पिग्गी बॉक्स विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहे.काका कोयटेसंस्थापंक समता स्कूल