संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा


  विद्यार्थ्यांनी केला राष्ट्रभाषेचा  सन्मान

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि १६ सप्टेंबर २०२४: शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन हिंदी दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आंतर शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेे, यात  द्रोणा अकॅडमी साकुरी, संत जनार्दन महर्षी विद्यालय कोपरगाव, संजीवनी अकॅडमी कोपरगाव, रेनबो स्कूल कोपरगाव आणि संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी या शाळेच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन राष्ट्रभाषेचा  सन्मान केला, अशी  माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जाहिरात

         सोहळ्याची  सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. प्रमुख अतिथी डॉ. संजय दवंगे यांनी हिंदी भाषेची जागतिक ओळख आणि तिचे महत्त्व यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी कविता वाचन आणि भाषण सादर करून हिंदी भाषेप्रती आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केले.

जाहिरात

           डॉ. दवंगे यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले की, हिंदी दिवस दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी भारतातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये साजरा केला जातो. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने घेतलेला निर्णय, भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार करण्याचा हा दिवस आहे. हिंदी ही एकता आणि संस्कृतीची भाषा आहे. ती केवळ आपली राष्ट्रभाषा नसून आपल्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी सर्वांना हिंदीच्या प्रसार आणि प्रचारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल आयोजीत हिंदी दिवसाचे औचित्य साधुन कविता व भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रमुख अतिथी डॉ. संजय दवंगे व प्राचार्या सुब्रमण्यम व इतरांसमवेत स्पर्धेतील विजयी विद्यार्थी.

        शेवटी, मुख्याध्यापिका सुधा सुब्रमण्यम यांनी सर्व सहभागी, शिक्षक आणि आयोजक समितीचे आभार मानले. शाळेच्या मुख्य शिक्षिका रेखा साळुंके  यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे