आमदार आशुतोष काळेकाळे गट

कोपरगावच्या विकासाला आडवे येणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत गाडून टाका-आ.आशुतोष काळे

कोपरगावच्या विकासाला आडवे येणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत गाडून टाका-आ.आशुतोष काळे

आ.आशुतोष काळेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले; ५ नंबर साठवण तलाव जलपूजन हजारो कोपरगावकरांच्या व साधू-संतांच्या साक्षीने संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १६ सप्टेंबर २०२४ :- कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला तर राजकारण कशावर करायचे? याची चिंता असणाऱ्यांनी आपली राजकीय दुकानदारी संपुष्टात येवू नये एवढ्या एका गोष्टीसाठी ५ नंबर साठवण तलाव होवू नये यासाठी न्यायालयात एक नाही तर आठ याचिका दाखल केल्या. अफवा पसरविल्या, अडथळे आणले मात्र त्यांना मी पुरून उरलो आणि दिलेला शब्द पूर्ण करून ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण दाखविले आहे. पाणी प्रश्न सुटला परंतु आपल्याला यावर थांबायचे नसून कोपरगावला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नंबर एक करायचे आहे. त्यासाठी यापुढे कोपरगावच्या विकासाला आडवे येणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत गाडून टाका असा घणाघात आ. आशुतोष काळे यांनी ५ नंबर साठवण तलावाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर रविवार (दि.१५) रोजी बहुचर्चित असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या जलपूजन प्रसंगी केले.

जाहिरात

कोपरगाव शहराचे नागरिक मागील अनेक दशकापासून जो प्रश्न सुटण्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करतांना ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला आहे. नुकतेच या ५ नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे विधिवत जलपूजन आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते व सर्व जाती धर्माचे साधू-संत, धर्मगुरू व हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.तत्पूर्वी के.जे.एस. कॉलेजपासून येसगाव येथील ५ नं.साठवण तलावापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी आ.आशुतोष काळे यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार आर्पण करून अभिवादन केले. कोपरगावकरांनी चौका-चौकात जेसीबीच्या सहाय्याने आ. आशुतोष काळे यांच्यावर पुष्वृष्टी केली तर ठिकठिकाणी सुवासिनींनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.

जाहिरात

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु केल्यापासून ज्यांना राजकीय दुकानदारी बंद होण्याची भीती होती त्यांच्याकडून शेवटपर्यंत अडचणी आणण्यात आल्या मात्र या अडचणींवर मात करून दिलेला शब्द पूर्ण केला. साठवण तलावाचे मटेरिअल समृद्धी महामार्गासाठी घेवून जाण्याचे ठरले असतांना त्यात झालेले राजकारण कोपरगावकर जाणून आहेत. मात्र निवडून आल्यावर दोनच महिन्यात काम सुरु करून कोपरगाव नगरपरिषदेचे जवळपास आठ कोटी रुपये वाचविले. तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळवून १३१.२४ कोटी निधी आणला. पहिला हफ्ता आल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेकडे १५ टक्के लोकवर्गणी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यावेळी विरोधकांनी साठवण तलावाचे काम पूर्ण होणार नाही अशा अफवा पसरविल्या. त्यावर मार्ग काढतांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्याने १५ टक्के रक्कम माफ करून आणले व कोपरगावकरांचे जवळपास २० कोटी रुपये वाचविले. साठवण तलावासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेकडे असलेली थकीत पाणी पट्टी भरण्यासाठी हफ्ते पाडून घेत पाणी आरक्षित केल्यानंतर शेतीचे पाणी कमी होईल अशी अफवा पसरवून न्यायालयात वेगवेगळ्या नावाने आठ याचिका दाखल करण्यात आल्या. त्याबाबत आजपर्यंत २२ तारखा झाल्या असून अजूनही सुनावणी सुरु आहे. अशा प्रकारे विरोधक कोपरगावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासुन वंचित ठेवू पाहत होते परंतु कोपरगावकरांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे त्यांचे मनसुबे यशस्वी होवू दिले नाही.

विरोधकांच्या कार्यकाळातील काम पाहिले तर जलतरण तलाव कुठे आहे? संगमनेर बस स्थानकाच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून बाजारपेठेला चालना मिळाले असती परंतु बस स्थानक चुकीचे बांधले, क्रीडा संकुलाचा शहराला उपयोग नाही असे अनेक चुकीचे काम केले आहे. याउलट कोपरगाव शहरामध्ये विकासात्मक अमुलाग्र बदल झाला असून अनेक शासकीय इमारती कोपरगावच्या वैभवात भर घालत आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन इमारत व कर्मचारी वसाहत,न्यायालय इमारत, पंचायत समिती, बस स्थानक व्यापारी संकुल, नगरपरिषद समोरील दोन व्यापारी संकुल, बाजार तळ व्यापारी संकुल, आय.टी.आय.कॉलेज अशा अनेक शासकीय इमारती आहेत. तसेच सर्व समाजाचे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभिकरण, जिजामाता उद्यान व इतर उद्याने, नदी संवर्धन, कोपरगाव अमरधाम, कब्रस्तान विकास तसेच सर्व प्रमुख रस्त्यांचा विकास झाला असून यासाठी साडेतीनशे कोटी निधी खर्च झाला असून भूमिगत गटार योजनेची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये असून हे ३२३ कोटी मिळून जवळपास ७०० कोटी निधी शहरासाठी आणला आहे.परंतु आपल्याला यावर थांबायचे नाही. आपल्याला कोपरगाव शहर स्मार्ट सिटी करायचे असून राज्यात नंबर एक करायचे आहे. एम.आय.डी.सी.चा फायदा कोपरगावला मिळणार असल्यामुळे कोपरगावची बाजारपेठ फुलण्यास मदत होणार आहे. मात्र आपल्या कोपरगाव शहराच्या विकासात यापुढे कुणीही आडवे येता कामा नये. यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विकासाच्या आडवे येणाऱ्यांना गाडून टाका असे आवाहन करून आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक

कुणाचे डोंगळे कुठेही निघू द्या, पण तलाव ——

 उपोषणाचा संघर्ष मोठा होता त्यावेळी एक पत्नी म्हणून मी काहीशी घाबरले होते. परंतु आ.आशुतोष काळे आपल्या निर्णयावर ठाम राहून ज्यावेळी कोपरगावकरांची तहान भागेल त्याचवेळी घरी येणार असल्याचे सांगितले. २०१९ ला आमदार झाल्यानंतर मा.आ.अशोकदादांनी सांगितले की, तुला आता साठवण तलाव पूर्ण करावाच लागेल.अशोकदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला संघर्ष पुढे सुरु ठेवून आलेल्या अनंत अडथळ्यांवर मात करून कोपरगावकरांच्या आशीर्वादाने त्यांनी साठवण तलावाचे काम अविरतपणे पुढे घेवून जात कोपरगावकर ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस उगवला. त्याचे तेज कोपरगावकरांच्या डोळ्यात दिसत आहे. याचा विशेष आनंद होत असून कोपरगावकरांसाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. साठवण तलाव काही नाही असे काही लोकांनी खोटे सांगितले. परंतु कोपरगावच्या महिला हुशार आहेत त्यांनी साठवण तलावाच्या कॉंक्रीटिकरण कामाच्या वेळी हजारो महिलांनी स्वत: उपस्थित राहून साठवण तलावाचे सुरु असलेले काम पाहिले. त्यावेळी कुणाचे डोंगळे कुठेही निघू द्या, पण आमचा तलाव झालाच पाहिजे हि महिलांची भावना ५ नंबर साठवण तलावाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करते. -सौ.चैतालीताई काळे.

आमदार काळे व सौ चैताली काळे

यावेळी व्यासपिठावर सर्व जाती धर्माचे साधू-संत,धर्मगुरू तसेच पद्माकांत कुदळे, महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, डॉ.अजय गर्जे,कोपरगाव शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी आदींसह कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही क्षणचित्रे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे