पूर्व भागातील साठवण बंधाऱ्यांत आले पाणी,विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
आ.काळे यांना तालुक्यात चाऱ्या, बंधाऱ्यांची संख्या किती ? अभ्यासाची गरज – विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२४–पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगावच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाण्यासाठी पाझर तलाव व साठवण बंधारे कोरडेठाक झाले होते.जोराचा पाऊस झाला त्या काळात ओव्हर फ्लोचे पाणी मिळावे यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पाठपुरावा केला होता.त्यानंतर विरोधकांना जाग येऊन त्यांनी घाई घाईत एका ठिकाणी जलपूजन करून जणू सर्वच गावांना पाणी मिळाले असे भासवण्याचा प्रयत्न केला होता. यावर आक्रमक पवित्रा घेत कोल्हे यांनी येवला येथे जावून अधिकाऱ्यांना अनेक गावांना पाणी मिळत नाही हे लक्षात आणून देत येवला येथे पालखेड डावा कालवा कार्यालय येथे जाऊन कोळगंगा गेट खुले करत पाणी उपलब्ध करून घेतले. या पाण्याचे आगमन झाल्यानंतर शिरसगाव -सावळगाव येथील कोळ नदीवरील साठवण बंधाऱ्याचे जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. आ.आशुतोष काळे यांना पाणी नियोजन पाच वर्षात जमले नाही यावर शेतकऱ्यांचा रोष सर्वत्र या निमित्ताने दिसला.
श्री व सौ प्रभाकर कोंडीराम उकिर्डे तसेच श्री व सौ रविकांत रावसाहेब भवर यांनी सपत्नीक पूजा केली.या प्रसंगी संचालक त्र्यंबक सरोदे, केशवराव भवर, साहेबराव रोहम साहेब, बबनराव निकम,माधवराव रांधवणे, अंबादास पाटोळे, रावसाहेब लासुरे आदींसह शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव, गोधेगाव, दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव या गावातून बहुसंख्य लाभार्थी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी ठिकठिकाणी दोनशे साठवण बंधारे तालुक्यात बांधून ठेवले म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे याची आठवण साहेबराव रोहम यांनी बोलताना व्यक्त दिली.