संगमनेर
अमृतवाहिनीच्या स्वामी महालेची १० लाख पॅकेज वर निवड
अमृतवाहिनीच्या स्वामी महालेची १० लाख पॅकेज वर निवड

संगमनेर विजय कापसे दि २२ मार्च २०२५—विद्यार्थ्यांच्या उच्च गुणवत्तेबरोबर चांगला निकाल आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला आहे. अमृतवाहिनीच्या आयटी विभागातील स्वामी सुनील महाले यांची टेनेरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.



