संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

संगमनेर विजय कापसे दि २३ फेब्रुवारी २०२५– संगमनेर येथील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इन फार्मासुटिकल्स : एक्सप्लोरिंग न्यू वे फॉर रिसर्च अँड डेव्हलोपमेंट या विषयावर राष्ट्रीय परिषद, शनिवार, दिनांक २२ फेब्रूवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत व्याख्यान देण्यासाठी औषधनिर्माण क्षेत्रातील प्रसिद्ध वक्ते उपस्थित होते. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च जामिया हमदर्द न्यू दिल्ली, येथील हेड ऑफ फार्मास्युटिकल डिपार्टमेंट डॉ. जावेद अली यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. कॉलेजचे प्राचार्यडॉ. एम. जे. चव्हाण यांनी सर्वमान्यवरांचे स्वागत केले.

या परिषदेच्या आयोजनामुळे औषधनिर्माण कंपन्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना परस्पर संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असे मत प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी व्यक्त केले. परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात आवर्जून उपस्थित होते. त्यानी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपुल्या दैनंदिन जीवनात कसा वापर होतो याची काही सुंदर उदारण दिली व परिषदेसाठी शुभेच्छा दिल्या.



