कोपरगाव औद्योगिक वसाहतीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कोपरगाव औद्योगिक वसाहतीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २६ सप्टेंबर २०२४–कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत सोसायटीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.विविध विषयांचे ठराव मंजूर करून भविष्यातील धोरण ठरवण्याच्या दृष्टीने विचारमंथन यावेळी करण्यात आले.मागील वर्षीचा इतिवृत्त वाचन झाले व पुढील अंदाजपत्रकावर चर्चा करून सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
सर्व संचालक सहकाऱ्यांनी साथ दिल्यामुळे नुकतेच १४.५२ कोटी निधी आपल्याला प्राप्त झाला.वेळोवेळी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी मोठे सहकार्य केले त्यातून अनेक कामे मार्गी लागली.इतर अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहतींना अडचणींना सामोर जावे लागले मात्र आपल्याला मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्यामुळे मोठी मदत झाली.
प्रामुख्याने जेव्हा औद्योगिक वसाहतीची सूत्र हातात घेतली तेव्हा असणारा ताळेबंद आव्हानात्मक होता.त्यावर मात करून चांगली प्रगती आपण केली आहे.रोजगार निर्मिती आणि कारखानदारांना आवश्यक सुविधा औद्योगिक वसाहत स्वतः करत आहे.स्थानिक उद्योजकांना उभारी देण्यासाठी स्व.कोल्हे साहेब यांनी धोरण घेऊन वसाहत स्थापन केली.तालुक्यात सद्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला असून वॉटरलेस इंडस्ट्रीच्या दृष्टीने काम व्हावे यासाठी प्रयत्न आहेत. सोनेवाडी एम आय डी सी मंजूर आहे त्यासाठी दहा हजार स्वाक्षरी मोहीम राबवत आपण पाठपुरावा केला होता.नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.कॉल सेंटर,कॉलेज यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.वसाहतीचे अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण निधी उपलब्ध केला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अधिक अमुलाग्र बदल होतील असा विश्वास विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.
नवउद्योजक पुरस्कार,कुलदीप देशमुख (युनिटी फार्मा),आदर्श उद्योजक पुरस्कार भरत शिंगी (शिंगी पॅकेजिंग), कोपरगाव तालुक्यातील नवोद्योजक पुरस्कार नितीन भुसारे (डी एन मार्ट) यांचा भरीव कार्य केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. नवीन उद्योजकांना व अनुभव संपन्न उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे. आमच्या पाठीशी कोल्हे कुटुंबीय नेहमी उभे असल्याने काम करण्यासाठी ऊर्जा मिळते व नवनवीन गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळते.कुठल्याही गोष्टीत न थांबता सातत्याने प्रगती करत रहावी अशा प्रकारचे विचार सत्कारमूर्तींच्या वतीने व्यक्त करण्यात आले.तसेच पंडित भारुड आणि सम्यक भारुड यांच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.
व्हा.चेअरमन केशवराव भवर,उपसरपंच विवेक परजने,संचालक मनोज अग्रवाल,पराग संधान,प्रशांत होन,रोहित वाघ,पंडित भारुड,चंद्रशेखर आव्हाड,परेश ठोळे,सागर शहा,अभिजीत रहातेकर,जितेंद्रसिंग सारदा,संजय जगदाळे,कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजने,शेतकरी संघाचे संभाजी गावंड,सोमनाथ निरगुडे आदींसह कारखानदार,उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.