आपला जिल्हा
ढगफुटीत नुकसानग्रस्तांना धोत्रेचे सरपंच गेले धावून;स्वखर्चाने दिले सर्वाना जेवण
ढगफुटीत नुकसानग्रस्तांना धोत्रेचे सरपंच गेले धावून;स्वखर्चाने दिले सर्वाना जेवण
ढगफुटीत नुकसानग्रस्तांना धोत्रेचे सरपंच गेले धावून;स्वखर्चाने दिले सर्वाना जेवण
कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४— गेल्या चार दिवसापासून कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून यामुळे अनेकांच्या घरात शेतात पाणी घुसून आतोनात नुकसान होत आहे. धोत्रे गावात बुधवार दि २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते या सर्वांच्या मदतीला गावचे सरपंच प्रदीप चव्हाण तत्काळ धावून जात त्यांनी अनोखे माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
गावातील दलित आदिवासी वस्तीवरील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक संसारपयोगी वस्तू ओल्या झाल्या होत्या. या सर्व बाबीचे गांभीर्य लक्षात घेता सरपंच चव्हाण यांनी तत्काळ प्रशासनासोबत संपर्क करत रात्रीतून सर्व घरातील व परिसरातील पाणी गावचे शिवबा प्रतिष्ठान, आंबेडकर चळवळीतील संघटना, विवेकभैया कोल्हे मित्र मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदींच्या सहकार्याने काढून देत सर्व नुकसानीचे प्रशासनामार्फत गुरुवारी सकाळी पंचनामे करून घेतले.
तसेच बुधवारी रात्रभर घरात पाणी असल्याने सर्व संसारपयोगी साहित्य ओले झाल्याने गुरुवारी त्या कुटुंबांना अन्न शिजवणे शक्य नव्हते कुटुंबातील लहान मुले भुकेने व्याकुळ होत होते ही बाब लक्षात घेत सरपंच चव्हाण यांनी त्या सर्व कुटुंबातील सदस्यांना सकाळचा चहा, जेवण व रात्रीच्या जेवणाची सोय स्वखर्चातून करत सर्वांना पोटभर जेवण दिले या प्रसंगी लहानग्याचा चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता.