आपला जिल्हा

भोजडे विद्यालयात कर्मवीरांची १३७ वी जयंती सोहळा उत्साहात

भोजडे विद्यालयात कर्मवीरांची १३७ वी जयंती सोहळा उत्साहात

सौ.सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय भोजडे

जाहिरात नोकरी मेळावा

कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील
भोजडे येथील सौ.सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.

जाहिरात

डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्टार प्रा. डॉ.प्रसाद काजळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी.एस.टी विभाग कोल्हापूरचे उपायुक्त चंद्रकांत मंचरे, प्रसन्न पाईपचे सर्वेसर्वा संजय बंब,स्कुल कमिटी चेअरमन भाऊसाहेब सिनगर , सरपंच सुधाकर वादे , वारी केंद्राचे केंद्र प्रमुख विलास भांड, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव ढेपले, नानासाहेब सिनगर, प्रकाश गायकवाड, अशोक काजळे, रंगनाथ सिनगर, दत्तात्रय सिनगर, नरोडे महाराज,माजी मुख्याध्यापक नारायण शिंदे आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी करत उपस्थित सर्वाना डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकरराव काळे यांच्या कार्याची महती सांगत विद्यार्थ्यांचा भविष्यासाठी विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची सूचना शालेय शिक्षक गोविंद गोरे यांनी मांडली तर त्यास शालेय शिक्षिका योगिता सुराळकर यांनी अनुमोदन दिले.

जाहिरात

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी तसेच शालेय विद्यार्थी भाषण प्रांजन संदीप पोटे, वैष्णवी सुभाष नरोडे व वाबळे प्रतीक्षा सोमनाथ आदींनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती देत सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय जिकरीने अभ्यास करत आपले आपल्या गावाचे शाळेचे नाव उज्वल करत नावलौकिक मिळवावा असा सल्ला देत सर्वाना शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी उपयुक्त चंद्रकांत मंचरे यांनी विद्यालयास १५ हजार रुपयेची देणगी देत सर्व विद्यार्थ्यांना केळी,फरसाण खाऊचे वाटप केले. तर प्रसन्न पाईपचे संजय बंब यांनी विद्यालयास ११ हजार रुपयांची देणगी दिली. तर माजी विद्यार्थी अभिषेक काजळे यांने विद्यालयास आपल्या नोकरीच्या पहिल्या पगारातून ११ हजार रुपयांची देणगी दिली.

तसेच याप्रसंगी मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत प्रथम श्रुती मंगेश सिनगर, द्वितीय गायत्री सचिन सिनगर व तृतीय क्रमांक प्रतीक्षा सचिन खटकाळे या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षक भागवत माळोदे यांनी तर आभार शालेय शिक्षिका कमल साबळे यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक दत्तू शिंदे, महारु चव्हाण, तबस्सुम शेख, रफिक सय्यद, काजल गायकवाड, आश्लेषा पोटे, शिवाजी धट, पंडित सिनगर आदींनी अथक परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे