कोपरगाव विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२४– येत्या काही दिवसावर नवरात्री उत्सव येऊन ठेपला असून कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील युवक श्री क्षेत्र माहूर गडावरून पायी ज्योत आणण्यासाठी शनिवार दि २८ सप्टेंबर रोजी टाकळी गावचे ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर यांच्या शुभहस्ते रथाची पूजा करून रवाना झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील श्री मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र माहूर गडावरून दरवर्षी पायी ज्योत आणत मोठ्या उत्साहात टाकळी येथे नवरात्र उत्सव साजरा करत असतात याही वर्षी सालाबाद प्रमाणे या मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून त्या अनुषंगाने श्रीक्षेत्र माहूरगडावरून ज्योत आणण्यासाठी या मंडळाचे सदस्य रवाना झाले असून त्यांचे या सोहळ्याचे हे १४ वे वर्षे आहे.
या प्रस्थान प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर, राजेंद्र देवकर,नवनाथ देवकर,रणजित ननवरे, संभाजी देवकर,मच्छिन्द्र थोरात, अमोल शिलावंत, दिपक शिलावंत, अमोल परदेशी, रामदास पाईक, रामदास जगदाळे, भाऊसाहेब देवकर, सुभाष देवकर, धोंडीराम देवकर,यशवंत देवकर,संतोष अहिरे,अजय शिलावंत, मनोज शिलावंत, सागर अहिरे,मनोज आहिरे,रोशन शिलावंत,सौरभ कडाळे,भागवत देवकर,श्रावण शिलावंत, नानासाहेब झुंगळे, श्रावण शिलावंत, मोहन मोरे,बबलू गायकवाड,कुंदन देवकर,किरण भोसले,गौरव देवकर,सागर परदेशी, कचरु शिलावंत,वाल्मिक अहिरे,दिपक अहिरे,अंकुश शीलावंत आदी मुंबादेवी मित्र मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.