आपला जिल्हा
मुक्ता पाटील पानगव्हाणे यांचा गुरुवारी दशक्रिया विधी
मुक्ता पाटील पानगव्हाणे यांचा गुरुवारी दशक्रिया विधी
मुक्ता पाटील पानगव्हाणे यांचा गुरुवारी दशक्रिया विधी
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी हसतमुख व्यक्तिमत्व असलेले मुक्ताजी पुंजाजी पाटील पानगव्हाणे यांचे मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी वृद्धपकाळाने वयाच्या ८८ व्या वर्षी दुःखद निधन झाले होते त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी ठीक सकाळी ८ वाजता कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे गोदावरी नदी किनारी होणार असून या प्रसंगी ह.भ.प दत्तात्रय महाराज चव्हाण यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
मायेची गेली सावली, करुणेचा हरवला सागर, उरली नाही साथ आम्हला, आठवण येते क्षणाक्षणाला या म्हणीप्रमाणे संपूर्ण तालुक्यात मुक्तापाटील या नावाने परिचित असलेले राजकारणाचा अत्यंत दांडगा अभ्यास असलेले मुक्ताजी पाटील पानगव्हाणे हे सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सोपान पानगव्हाणे यांचे थोरले बंधू तर राहता येथील प्रसिद्ध डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी जानकाबाई मुक्ताजी पानगव्हाणे, भाऊ सोपान पुंजाजी पानगव्हाणे, नामदेव रुंजाजी पानगव्हाणे, मुलगा सोमनाथ मुक्ताजी पानगव्हाणे, डॉ बापूसाहेब मुक्ताजी पानगव्हाणे, बहीण नर्मदाबाई रामचंद्र सदाफळ, शांताबाई काशिनाथ महाले, मुलगी विमल प्रभाकर बोऱ्हाडे, भाची सुमन रावसाहेब बोठे, नातू रंजीत शिवाजीराव गावंड, नात रंजना उमेश गुंजाळ, सुरेखा निलेश बकाल-पाटील, पुतणी संगीता विजय सोनवणे आदी नातू पणतू असा मोठा परिवार असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण पानगव्हाणे परिवार व माहेगाव देशमुख गावावर शोककळा पसरली आहे.