काळे गट

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे  त्यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते होणार शासकीय अनावरण

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे  त्यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते होणार शासकीय अनावरण

मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांची माहिती

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑक्टोबर २०२४:– साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आजपर्यंत अनावरण न झाल्यामुळे समाजात देखील मोठ्या प्रमाणात या विषयावर असंतोष आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आचारसंहिता लागली तर साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबले जाईल. यासाठी आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे यांनी सोमवार (दि.०७) रोजी अनावरण सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले असून त्यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी गौतम बँकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

जाहिरात नोकरी मेळावा

यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके यांनी सांगितले की, विजयराव वहाडणे नगराध्यक्ष असतांना आ. आशुतोष काळे यांनी लोकशाहीरअण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे ठरविले होते. परंतु विरोधकांनी आपल्याला श्रेय मिळणार नसल्यामुळे या पुतळ्याचे अनावरण आजवर होऊ दिले नाही. श्रेय वादासाठी पुतळ्याचे अनावरणावरून काही विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने गावात शांतता भंग कशी होईल,आपापसात भांडण कसे लागतील, समाजा-समाजात भांडण कशी लागतील हे त्यांचं काम सध्या सुरुच आहे. पंरतु त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी सांगितलं होतं की, जर विरोधक विरोध करत असतील तर आपण या गोष्टीसाठी थांबून घेऊ व त्यावेळी थांबून देखील घेतले. परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे जर आचारसंहिता लागली तर हे अनावरण पुन्हा लांबले जाईल त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी पुढाकार घेतला असून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनभाऊ साठे सोमवार (दि.०७) रोजी अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असून आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती दिली.

जाहिरात

यावेळी मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बारा वर्षे गोडावून मध्ये होता. श्रेय कुणाला या विषयाभोवती चर्चा घुटमळत राहीली. कोपरगाव शहरात कामापेक्षा अडथळ्यांची शर्यत फार मोठी आहे. नेते तसेच कार्यकर्ते असल्यामुळे जे वारंवार राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्षा  सुरेखाताई राक्षे यांच्या कार्यकाळात सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कोपरगाव शहरात येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे पुतळा ज्या चबुतऱ्यावर बसवायचा त्या चबुतऱ्याचे भूमिपूजन ठरलं असतांना दुर्दैवाने कोल्हेंशी निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या काही अण्णाभाऊ साठे प्रेमी कार्यकर्त्यांनी चबुतऱ्याला देखील विरोध केला. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी तो विरोध हाणून  पाडला. ज्यावेळी कोपरगाव शहरांमध्ये अतिशय जल्लोषात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे स्वागत केले त्यावेळी पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोष सामील होते व त्यांचे किमान ५० फ्लेक्स लागले होते. पुतळा बसवला परंतु आमचा कार्यकाल संपला व पुतळा अनावरण श्रेयवादात अडकले. अण्णाभाऊ साठे संघटना कार्यकर्ते यांनी लवकर अनावरण करावे यासाठी उपोषण केली, आंदोलन झालं, मोर्चे पण झाले पण यश आले नाही. सर्वांना हात जोडून विनंती आहे विशेषतः सातत्याने विरोधाचे राजकारण करणाऱ्यांनी जो काही संघर्ष असेल, घोडा मैदान जवळच आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जाहीरपणे जनतेची साक्षीने बोलू, पण जर कुणी आण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याच्या अनावर सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना समाज माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.

जाहिरात

चोवीस तास राजकारण करून शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेवून शहरातील काही तथा कथीत बडे नेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कमान उभारण्याचे ठरलं असतांना त्यावेळी जाणीवपूर्वक विरोध करून माझ्याकडे महापुरुषांची यादी पाठवत यादीप्रमाणे कमानी उभारायच्या असल्याचे सांगितले. मी हा विषय सर्वसाधारण सभेत घेत ज्यांना महापुरुषांची कमानी उभारायचे आहेत त्यांना मंजुरी घेतली परंतु आजपर्यंत कुणीही अशी कमान किंवा प्रवेशद्वार कोपरगाव शहरात उभी केली नाही केवळ विरोधाला विरोध करून प्रसिध्दीसाठी त्यांची धडपड होती.

जाहिरात मुक्त

सचिनभाऊ  साठे यांच्या शुभहस्ते व तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ज्या अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं आहे. त्यांचे साहित्य लंडन पर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या साहित्याचा अभ्यास चालू आहे. ज्या अण्णाभाऊ साठे यांनी एवढे मोठे साहित्य भांडार उभे केले. एवढ्या महान व्यक्तीच्या पुतळा अनावरणात वाद करणे याचा अर्थ आपण अण्णाभाऊ साठे यांच्या पायाजवळ देखील उभे राहण्याच्या पात्रतेचे नाहीत हे सिद्ध होईल. उपोषणकर्ते, कार्यकर्ते व सर्व आण्णाभाऊ साठे प्रेमी बऱ्याच काळापासून पुतळा अनावरणासाठी प्रयत्न करीत होते त्या प्रयत्नांना यश मिळाले असून या कार्यक्रम सोहळ्याचे आयोजक कोपरगाव नगरपरिषद राहणार असल्याचे मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, विरैन बोरावके, मेहमूद सय्यद, अजिज शेख, रमेश गवळी, सुनील शिलेदार, स्वप्रिल निखाडे, राजेंद्र वाकचौरे, तूपसोंदर सर, फकीर मामू कुरेशी, सागर लकारे, चंद्रशेखर म्हस्के, कांबळे, राजेंद्र खैरनार आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे