साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा होणार यंदाचा नवरात्रोत्सव- जनार्दन कदम
साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा होणार यंदाचा नवरात्रोत्सव- जनार्दन कदम
कोपरगाव विजय कापसे दि ३ ऑक्टोबर २०२४–महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली साई निवारा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित यंदाचा नवरात्रोत्सव व श्री सप्तशृंगी माता मंदिराचा नववा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात विविध उपक्रमाने साजरा होणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कदम यांनी दिली आहे.
या विषयी कदम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घटस्थापना होऊन समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे व प्रसिध्द व्यापारी श्री व सौ दिपकशेठ विसपुते यांच्या शुभहस्ते आरती संपन्न होईल.
शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे तर सायंकाळी साडेसात वाजता शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री व सौ शिरीष वमने, कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक श्री व सौ भगवान मथुरे व कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री व सौ सुहास जगताप यांच्या हस्ते आरती होऊन रात्री ८ वाजता महिलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न होणार असून यात उखाणे स्पर्धा, लहान मुलांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न होणार आहे.तसेच या प्रसंगी श्री व सौ सतीश गर्जे व श्री व सौ बाबासाहेब कापे यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन साडेतीन शक्तीपीठ दर्शनाचा कार्यक्रम आदित्य डुचे व स्वप्नील बोऱ्हाडे सादर करणार आहे.
शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष श्री व सौ पराग संधान व ठोळे उदयोग समूहाचे संचालक श्री व सौ राजेश ठोळे यांच्या शुभहस्ते आरती संपन्न होऊन रात्री आठ वाजता विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी धार्मिक व समाज प्रबोधन गीतावर डान्स स्पर्धा संपन्न होणार आहे.
रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत एस जे एस हॉस्पिटल यांच्या सौजन्याने वर्धापन दिन महाआरोग्य शिबिर होणार आहे तर सायंकाळी ६ वाजता संदीप जाधव यांचा होम मिनिस्टर खेळ मानाच्या पैठणीचा फुल कॉमेडी शो कार्यक्रम होऊन सायंकाळी साडेआठ वाजता पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते आरती संपूर्ण होऊन रात्री ८.४५ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
तसेच गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर ते शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ या काळात रोज रात्री ९ ते ११ या वेळेत भव्य दिव्य असा दांडिया गरबा चा कार्यक्रम संपन्न होऊन. यात दांडिया खेळणाऱ्या स्थानिक महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे दररोज २ पैठणी साड्या बक्षिस स्वरूपात दिल्या जाणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी महिलांनी साई निवारा मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव व श्री सप्तशृंगी माता मंदिराच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन साई निवारा महिला मंडळ कोपरगावच्या अध्यक्षा नंदीनी जनार्दन कदम यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद जोशी गुरु, दिपिका कुलकर्णी, मिलिंद जोशी गुरु यांच्यासह निवारा मित्र मंडळ, निवारा भजनी मंडळ, समता परिवार, सुभद्रा नगर प्रतिष्ठान, कृष्णविनायक मित्र मंडळ, रिद्धी सिद्धी नगर, हिंदुराष्ट्र तरुण मंडळ आदिसह निवारा, सुभद्रा नगर, कोजागिरी कॉलनी, रिद्धी सिद्धी नगर, जानकी विश्व, ओम नगर, येवला रोड, विद्यानगर, आढाव वस्ती, श्रीरामनगर, साई सिटी, भामा नगर ,रचना पार्क आदी स्थानिक रहिवाशांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.