महायुती शासनाच्या कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतील -आ. आशुतोष काळे
महायुती शासनाच्या कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतील -आ. आशुतोष काळे
महायुती शासनाच्या कल्याणकारी योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतील -आ. आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि ३ ऑक्टोबर २०२४ :- राज्यातील सर्वच घटकांचा विचार करून त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला अशा अनेक घटकांसाठी महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा प्रसार आणि प्रचार होवून गरजू नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत या योजना निश्चितपणे पोहोचतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगाव शहरातील सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची शाखा आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आली. यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते.याप्रसंगी शासनाने सुरु केलेल्या कल्याणकारी योजना यापुढे देखील सुरु राहाव्यात यासाठी विद्यार्थ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने हा विदयार्थी संवाद दौरा सुरु करण्यात आला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ६० लाखापेक्षा जास्त नवमतदार असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थी संघटनेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्या काही लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत जे काही निर्णय घेतले आहेत ते निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असून अंमळनेर पासून सुरु झालेला हा दौरा नगर मतदार संघातून मराठवाड्यात जनजागृती करण्यासाठी जाणार असल्याचे संगीतले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, माजी नगरसेवक मंदार पहाडे, स्वप्निल निखाडे, जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, दिनकर खरे,सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश डागा,तालुका अध्यक्ष निखिल डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, शाखाप्रमुख ओम आढाव, सचिव अभिषेक सरदार, संघटक तुषार परमार, उपशाखाप्रमुख चंद्रकांत धोत्रे, सागर लकारे,महेश उदावंत, शुभम शिंदे, संदेश कानडे, तन्मय साबळे, संकेत पारखे, बंडू आढाव.आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.