मका उत्पादन वाढीसाठी कोपरगावात शेतकरी परिसंवाद मेळावा संपन्न
मका उत्पादन वाढीसाठी कोपरगावात शेतकरी परिसंवाद मेळावा संपन्न
मका उत्पादन वाढीसाठी कोपरगावात शेतकरी परिसंवाद मेळावा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४– निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला असून त्यातून अनेक शेतकरी अर्थिक विवंचनेतून वेगळा मार्ग पतकरीत असल्याच्या घटना दिवसेंदिवस सामोऱ्या येत असतात यातून कमी काहीसा मार्ग निघावा म्हणून कमीत कमी खर्चात ऐकरी जास्तीत जसर उत्पादन जास्त कसे मिळवता येईल या करिता नुकतेच कोपरगाव येथे शेतकऱ्यांसाठी मका पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
कोपरगाव शहरातील डॉ चिंतामणी देवकर सभागृहात शुक्रवार दि ४ ऑक्टोबर रोजी पीक तज्ञ डॉ बाळकृष्ण जडे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत एकरी १०० क्विंटल मका पिकाचे उत्पादन कसे काढता येईल यावर अत्यंत साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करत सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निरसन केले.
या प्रसंगी प्रसिध्द शेती अभ्यासक तथा आश्वमेध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर वाकचौरे, प्रगतशील शेतकरी संचिन कोल्हे, प्रकश सांगळे,राजेंद्र मांढरे, किशोरराजे शिंदे, सुहास वाबळे, शिवाजी गायकवाड, चेतन देवकर, बाळासाहेब देवकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील प्रसिद्ध वरिष्ठ कांदा तज्ञ डॉ श्रीधर देसले हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याचा एकरी २०० क्विंटल उत्पादन कसे मिळवता येईल यावर मार्गदर्शन करणार असून तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोड अयोध्यानगरी येथील डॉ चिंतामणी देवकर सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले असून या परिसंवादाकरिता प्रति व्यक्ती २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ७८४०९१६२०६ व ९४२०००८२९१ या मोबाईल नंबर वर संपर्क साधत नावनोंदणी करावी.