कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन
कोपरगाव विजय कापसे दि ६ ऑक्टोबर २०२४ – सहकारात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.०८) रोजी सकाळी १०.३० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. शंकरराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शकुंतलाताई चव्हाण यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी दिली आहे.
कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर तसेच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा निर्णय घेवून मागील वर्षी पूर्ण क्षमतेने संपूर्ण नव्या युनिटवर यशस्वी गाळप हंगाम घेवून हा ऐतिहासिक गळीत हंगाम ठरला असून यापुढे देखील अनेक विक्रम नोंदले जाणार असून कारखान्यासह सर्व उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याच्या या ७० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे या कार्यक्रमास सर्व सभासदांनी व कारखान्यावर प्रेम करणा-या हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे व कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.